सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्रमदानातून स्वच्छता

स्वच्छता राखून नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम विद्यापीठात राबविण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्रमदानातून स्वच्छता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) ‘स्वच्छता ही सेवा’  याअंतर्गत एक तास श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) जयंतीनिमित्त रविवारी (दि. १) विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व विद्यार्थी विकास मंडळ या विभागाच्या वतीने हा श्रमदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसह विद्यापीठ परिसरात प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर (Dr. Parag Kalkar) यांच्या उपस्थितीत एक तास श्रमदान करण्यात आले.

 

स्वच्छता राखून नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हा उपक्रम विद्यापीठात राबविण्यात येत आहे. यासाठी आपण सर्वांनी रोज एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान देऊन स्वच्छतेविषयी असलेली आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी यावेळी केले. 

वैद्यकीय महाविद्यालयांना एक चूक पडणार एक कोटीला; प्राध्यापक, डॉक्टरांवरही कारवाई

 

स्वच्छतेने आपल्या आयुष्यात समृद्धी येते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. त्यामुळे स्वच्छता ही सवय बनवून त्याची शिस्त सर्वांनी अंगिकारावी, असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले. या उपक्रमात शिवनेरी ब्रिगेड येथील परमवीर चक्र विजेता आठ महार बटालियन यांनी श्रमदानाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 

मेजर साकेत पांडे यांच्या नेतृत्वात १०० जवान यांनी यावेळी श्रमदान केले. स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा अंतर्गत संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ  दिली. अधिष्ठाता डॉ. दिपक माने, डॉ. विजय खरे, संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, सफाई कर्मचारी, एनसीसी, रासेयो आणि शैक्षणिक विभागांचे १०० हून अधिक विद्यार्थी यांनी या उपक्रमांतर्गत श्रमदान केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j