ब्रिटीश कौन्सिल : प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी व ब्रिटीश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली.

ब्रिटीश कौन्सिल : प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण
MOU between British Council and Higher Education department

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटीश कौन्सिलमध्ये सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यातील विविध शिक्षणसंस्थांमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. उच्च शिक्षणाची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. (MOU between British Council and Higher Education department)

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी व ब्रिटीश कौन्सिलचे निदेशक राशी जैन यांनी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी ब्रिटीश कौन्सिल इंडियाचे संचालक एलिसन बॅरेट एमबीई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर हेही उपस्थित होते.

हेही वाचा : MPSC Online Exam : व्यापम घोटाळा महाराष्ट्रात होवू देऊ नका!

मंत्री पाटील यावेळी बोलताना म्हणाले, ‘जागतिक पातळीवर स्टार्टअप, नवीन संशोधन, इनोव्हेशन याला अधिक महत्व देऊन विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यपूर्ण करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामुळे मोठी संधी उपलब्ध झाली आहे.’ रस्तोगी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांचे आंतरराष्ट्रीयीकरण व्हावे ही शासनाची भूमिका आहे, या करारामुळे भारत आणि यूके (UK) यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक वाढेल आणि नवीन शैक्षणिक संधी अधिक निर्माण होतील.

हेही वाचा : नव्या धोरणात व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर भर : चंद्रकांत पाटील

एलिसन बॅरेट एमबीई म्हणाले की, संस्थात्मक प्राधान्याशी जुळवून घेणाऱ्या बाबींचा उच्चस्तरीय धोरण संवादांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अनुभव आणि रोजगारक्षमता सुधारणे आणि यातून महाराष्ट्रासाठी चांगले सामाजिक-आर्थिक भविष्य निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांना नवीन कौशल्य व तंत्रज्ञानासह उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रासोबत हा करार केला आहे. या माध्यमातून परिसंवाद, कार्यशाळा आयोजित करून शैक्षणिक क्षेत्रात होत असलेली बदल याबद्दल प्रशिक्षण देण्यात येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल, असा विश्वास राशी जैन यांनी व्यक्त केला.