पुण्यातून एकट्या प्रियदर्शनी स्कूलचा देशातील ८५४ हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश 

देशातील या मोजक्या शाळांमध्ये आता पुण्यातील 'प्रियदर्शनी स्कूल' चा ही समावेश झाला आहे. 

पुण्यातून एकट्या प्रियदर्शनी स्कूलचा  देशातील ८५४ हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले डिजिटलाईजेशन, कोविड काळात ऑनलाईन क्लासला (Online class) आलेले महत्व या पार्शवभूमीवर आता देशातील काही शाळा 'हायब्रीड लर्निंग 'कडे (hybrid learning) वळत आहेत. त्यात विद्यार्थ्यांना नेहमीच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पुण्यातील नामांकित शाळांच्या यादीत अग्रणी असलेल्या 'प्रियदर्शनी स्कूल' (Priyadarshini School) या एकमेव शाळेची डिजिटल हायब्रीड लर्निंग स्कूलसाठी करण्यात आली. त्यामुळे आता देशातील काही निवडक हायब्रीड लर्निंग शाळांमध्ये  पुण्यातील 'प्रियदर्शनी स्कूल'चा ही समावेश झाला आहे. 

CBSE, Microsoft आणि Tag यांच्या वतीने विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या  'हायब्रीड लर्निंग ' उपक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून एकट्या प्रियदर्शनी शाळेची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नुकतेच शाळेतील हायब्रीड लर्निंग नोड वर्ग खोल्यांचे उदघाट्न करण्यात आले.त्यामुळे भोसरी येथील इंद्रायणी नगर येथील 'प्रियदर्शनी स्कूल'चा समावेश देशभरातील ८५४ हायब्रीड लर्निंग शाळांमध्ये झाला आहे.शाळेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने हायब्रीड लर्निंगकडे मोठ्या दिमाखात वाटचाल केली आहे.

शाळेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त तरुणा सिंग यांच्या हस्ते हायब्रीड लर्निंग वर्ग खोल्यांचे उदघाट्न करण्यात आले.या कार्यक्रमास व्यवस्थापकीय विश्वस्त नरेंद्र सिंग,मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव, मुख्याध्यापिका अर्पिता दिक्षीत CBSE, Microsoft आणि Tag चे प्रतिनिधी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.तसेच इतरही शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. 

शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव म्हणाल्या, " हायब्रीड लर्निंग प्रोग्राममुळे आमच्या विद्यार्थ्यांना  तज्ज्ञांकडून कुशल शिक्षण घेण्यास मदत होईल. TAG टीमद्वारे डिजिटल साक्षरता कार्यक्रमानुसार इयत्ता १० वी  आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना CBSE, Microsoft आणि त्याच्या भागीदाराद्वारे मोफत प्रशिक्षण केले जाईल.त्याचे प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना दिले जाईल.तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव करता आहोत."