SSC Result : इंद्रायणीनगर प्रियदर्शनी स्कूलची निकालाची उज्ज्वल परंपरा ; स्वराज शिंदे ९५.२० गुण मिळवून शाळेत प्रथम

इंद्रायणीनगर प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमधील १६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

SSC Result : इंद्रायणीनगर प्रियदर्शनी स्कूलची निकालाची उज्ज्वल परंपरा ; स्वराज शिंदे ९५.२०  गुण मिळवून शाळेत प्रथम
Indrayani Nagar Priyadarshani English Medium School Ssc result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 पिंपरी चिंचवड परिसरातील नामांकित शाळा म्हणून ओळखल्या जाणा-या भोसरी येथील इंद्रायणीनगर प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलचा (Indrayani Nagar Priyadarshani English Medium School )दहावीचा निकाल शंभर टक्के (10th result hundred percent) लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपली निकालाची उज्ज्वल परंपरा शाळेने यंदाही कायम ठेवली आहे. शाळेत स्वराज शिंदे (Swaraj Shinde) याने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

हेही वाचा : शिक्षण SSC Result : प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूलचे उत्तुंग यश; ओम शिंदेने पटकावला प्रथम क्रमांक

     शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या इंद्रायणीनगर प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमधील १६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तर एकूण २०९ विद्यार्थ्यांपैकी १२२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ७९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

        शाळेत प्रथम क्रमांक पटकावणा-या स्वराज शिंदे याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.तर सुजल बेलाले याने ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्राची गोरे आणि अनुष्का गायकवाड या दोघींनी ९४.४० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवत बरोबरी साधली आहे.
 प्रियदर्शनी व्यवस्थापनाच्या संस्थापक सचिव तरूणी सिंग, शाळेचे व्यवस्थापक व विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंग , व्यवस्थापक व विश्वस्त नरेंद्र सिंग आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्पिता दीक्षित यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे शाळेला हे यश मिळाले आहे. 


डॉ.राजेंद्र सिंग म्हणाले, " प्रत्येक मूल हे अद्वितीय म्हणून जन्माला येते.शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करुन त्यांच्या कला ,गुणांना वाव देते.त्यामुळे शाळेत येणारे प्रत्येक मुलं हे सर्वच परीक्षेत उज्ज्वल यश मिळवते "   


" आजचे हे यश विद्यार्थ्यांच्या  जिद्द, चिकाटी व मेहनतीचे फळ आहे " असे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्पिता दीक्षित यांनी सांगितले.तसेच सीबीएसईच्या मुख्याध्यापिका डॉ.गायत्री जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.