मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

परदेशी उच्च शिक्षणासाठी विविध घटकांसाठी राज्य सरकारडून शिष्यवृत्ती दिली जाते. आता मराठा व कुणबी विद्यार्थ्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,  मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
Cabinet Meeting

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मराठा (Maratha) व कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) मंगळवारी महत्वाचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी (Higher Education) सयाजीराव गायकवाड सारथी योजनेवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्या मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी केवळ देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (Scholarship) दिली जाते.

परदेशी उच्च शिक्षणासाठी विविध घटकांसाठी राज्य सरकारडून शिष्यवृत्ती दिली जाते. आता मराठा व कुणबी विद्यार्थ्यांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (Sarthi) मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती ही योजना राबविली जाते. याअंतर्गत राज्यातील ३०० विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. आता परदेशी उच्च शिक्षणासाठीही योजना सुरू करण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेत घोटाळा? परीक्षा केंद्र ‘मॅनेज’ करून गुण वाढविल्याचे पुरावे

सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. देशांतर्गत योजनेप्रमाणेच या योजनेतही शिक्षण शुल्क, वसतिगृह तसेच इतर शैक्षणिक खर्च भागविला जाऊ शकतो. अद्याप या योजनेबाबत माहिती सारथीकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

देशांतर्गत शिष्यवृत्तीची माहिती -

सारथीकडून मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती ही योजना राबविली जाते. याअंतर्गत राज्यातील ३०० मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, व कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. ० ते ३ लाखापर्यंत, ३ ते ५ लाखापर्यंत आणि ५ ते नॉन क्रिमी लेअर मर्यादेपर्यंत अशा तीन गटात प्रत्येकी १०० विद्यार्थी पात्र ठरतात.

MPSC : आयोगाकडून काळ्या यादीत टाकलेल्या ८३ जणांची नावे जाहीर, वाचा सर्व विद्यार्थ्यांची नावे

या योजनेअंतर्गत ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, वसतिगृह इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी २५ हजार व शैक्षणिक साहित्य व इतर शैक्षणिक खर्चासाठी २५ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये दरवर्षी दिले जातात.

EduVarta च्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर क्लीक करा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo