CTET परीक्षेचे मार्कशीट डिजीलॉकरवर करणार प्रसिद्ध 

CBSE बोर्डाने डिजीलॉकरद्वारे उमेदवारांना CTET 2024 डिजिटल मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे.

CTET परीक्षेचे मार्कशीट डिजीलॉकरवर करणार प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

CBSE ने देशभरातील विविध केंद्रांवर २१ जानेवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा  CTET चे आयोजन केले होते. एक नवीन प्रयोग करत या परीक्षेचे निकाल डिजीलॉकरवर अपलोड करण्याचा निर्णय CBSE बोर्डाने घेतला आहे. मीडिया रिपोर्ट नुसार CBSE बोर्डाने डिजीलॉकरद्वारे उमेदवारांना CTET 2024 डिजिटल मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. CBSE च्या मते, 'ग्रीन इनिशिएटिव्ह'च्या दिशेने हा प्रयत्न आहे.

CBSE CTET 2024 साठी बसलेल्या उमेदवारांसाठी DigiLocker खाती तयार करेल. नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकांद्वारे खाते ओळखपत्रे प्रदान केली जातील. उमेदवार दिलेली क्रेडेन्शियल्स वापरून त्यांची CTET 2024 मार्कशीट आणि पात्रता प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील. आयटी कायद्यानुसार डिजिटल स्वाक्षरी केलेल्या मार्कशीट्स आणि पात्रता प्रमाणपत्रे कायदेशीररित्या वैध आहेत.

हेही वाचा : तलाठी परीक्षेत 200 प्लस मार्क मिळालेले एकाच गावचे; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा नवा आरोप

CBSC  ने प्रसिध्द  केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, "परीक्षेशी संबंधित प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा समावेश करणे आणि पर्यावरण संरक्षण हे मंडळाने उचललेले एक भक्कम पाऊल आहे. मंडळ मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवते आणि आहे. कागद, झाडे आणि पाणी यासारख्या मौल्यवान संसाधनांची बचत करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
CTET 2024 परीक्षेसाठी एकूण २६  लाख, ९३ हजार, ५२६  उमेदवारांनी नोंदणी केली होती. CTET परीक्षा देशभरातील १३५ शहरांमधील ३, ४१८  परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. पेपर १ परीक्षेसाठी एकूण ९ लाख, ५८, उमेदवारांनी नोंदणी केली होती.  आणि पेपर २ CTET  परीक्षेसाठी १७ लाख, ३५ हजार, ३३३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. CTET 2024 चा पेपर 1 इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी आयोजित केला जातो, तर पेपर २ हा इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शिक्षकांच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी आयोजित केला जातो.