ब्रेकिंग न्यूज: विद्यापीठातील १११ पदांची प्राध्यापक भरती सप्टेंबरमध्ये 

पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठातील रिक्त पदांचे आरक्षण शासनाकडून तपासून घेण्यात आले आहे. विद्यापीठातील आरक्षण विभागाकडूनही त्याची तपासणी झाली आहे. आता विभागातील समांतर आरक्षण व इतर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

ब्रेकिंग न्यूज: विद्यापीठातील १११ पदांची प्राध्यापक भरती सप्टेंबरमध्ये 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमधील एकूण १११ प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती (Recruitment of Professor Vacancies) प्रक्रिया सप्टेंबर महिना अखेरीस सुरू केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार प्राध्यापकांना (Job opportunities for unemployed professors) नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यापीठाला सुध्दा पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार असल्याने शैक्षणिक गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा : शिक्षण SPPU NEWS : विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पद भरती ; सहा महिन्यात रिक्त पदे भरण्याच्या सूचना

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया केल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. शासनाने २०८८ पदे भरण्यास मान्यता दिली होती.त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जात आहेत. आता विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोंडवाना विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , आदी विद्यापीठांनी रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध असून  काहींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुद्धा प्राध्यापक पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठातील रिक्त पदांचे आरक्षण शासनाकडून तपासून घेण्यात आले आहे. विद्यापीठातील आरक्षण विभागाकडूनही त्याची तपासणी झाली आहे. आता विभागातील समांतर आरक्षण व इतर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.त्यानंतर विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत किंवा तत्पूर्वी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

वेगळी बातमी : ‘नॅक’बाबत मंत्री चंद्रकांत पाटील थेट मंत्रालयात घेणार विद्यापीठांची ‘हजेरी’

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे विभाग चालवणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर प्राध्यापकांच्या नियुक्ती केल्या आहेत. नुकतेच यातील काही प्राध्यापकांना नियुक्तीपत्र दिले आहे. सप्टेंबर महिन्यात ही प्रक्रिया सुरू होऊन ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत  पूर्ण होईल.त्यामुळे विद्यापीठाच्या घसरलेल्या रँकिंगमध्ये सुधारणा या प्राध्यापकांची मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.