‘या’ वैद्यकीय महाविद्यालयांनाच मिळणार पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परवानगी

नवीन अटींनुसार,  या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या  ७५ टक्के खाटांवर वर्षभरात रुग्ण ऍडमिट झालेले असले पाहिजेत.

‘या’ वैद्यकीय महाविद्यालयांनाच मिळणार पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परवानगी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

ज्या वैद्यकीय महाविद्यालयांना (Medical College) आगामी शैक्षणिक सत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करायचे असतील, अशा महाविद्यालयांसाठी नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC)  किमान मानकांचा मसुदा जारी केला आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांनाच येत्या  शैक्षणिक सत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी (PG Admission) विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी दिली जाईल, असे पत्रक NMC च्या  सहाय्यक सचिव रीता सिंह यांनी जारी केले आहे.

 

NMC च्या नवीन अटींनुसार,  या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या  ७५ टक्के खाटांवर वर्षभरात रुग्ण ऍडमिट झालेले असले पाहिजेत. याशिवाय २०० खाटांचे रुग्णालय असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करता येतील, मात्र त्यासोबत बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि रेडिओ डायग्नोसिस हे चार विभाग कार्यरत असावेत.

शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थी 'या' ठिकाणांना देतात सर्वाधिक प्राधान्य

एका आठवड्यात किमान २० प्रसूती झाल्या, तरच स्त्रीरोग व प्रसूती विभागांतर्गत दोन पदव्युत्तर जागांना प्रवेश देता येईल, अशीही अट लावण्यात आली आहे. येत्या १० दिवसांत मिळालेल्या सूचनांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम मानक जारी केले जातील.

 

या मानकांची पूर्तता करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांना आगामी शैक्षणिक सत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी दिली जाईल. ज्यांना या परवानगीची गरज आहे त्यांना दररोज किमान ५० रुग्णांची ओपीडी करावी लागणार आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j