ABVP च्या मागण्या मान्य ; पण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास विद्यापीठाकडून सुरूवात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.मात्र, कार्यकर्त्यांनी केलेल्या तोंडाफोडीवर विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

ABVP च्या मागण्या  मान्य ; पण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यास विद्यापीठाकडून सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) मुख्य इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विद्यार्थी हिताचे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू होती.  या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून सभागृहात प्रवेश करत जे आंदोलन करण्यात आले ते दुर्दैवी होते. आंदोलकांनी जे मागण्यांचे निवेदन दिले, त्या सर्व मागण्यांची दखल घेत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.मात्र, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या तोडफोड प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.विद्यापीठाने विद्यार्थी हिताच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.मात्र, कार्यकर्त्यांनी केलेल्या तोंडाफोडीवर विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा : पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ABVP चा राडा

व्यवस्थापन परिषदेदरम्यान घेण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणे :

 

१) १ मे २०२३, महाराष्ट्र दिनापासून विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल अटी व शर्तींसह विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

२) काही विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले असे विद्यार्थी परिषदेचे म्हणणे आहे, त्या विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत हा विषय निकाली काढण्यात येईल.

 

३) विद्यापीठाचा पदवीदान समारंभ हा दिनांक १५ ते २० मे २०२३ दरम्यान करण्याचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू करण्यात आले आहे.

 

४) वादग्रस्त व्हिडिओ शुटींग विषयात याआधीच विद्यापीठाकडून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून सबंधित व्यक्तींची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच अंतर्गत चौकशीसाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाकडूनही उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

 

५) आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या तोडफोड प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.