ललित कला केंद्रातील घटनेप्रकरणी 'एनएसडी' विद्यार्थी संघटनेकडून निषेध

ललित कला केंद्रातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी जगभरातील कलाकारांनी एकत्र येण्याचे आवाहन करतो.

ललित कला केंद्रातील घटनेप्रकरणी 'एनएसडी' विद्यार्थी संघटनेकडून निषेध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)ललित कला केंद्रात (Center for Fine Arts)घडलेल्या हिंसक हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. तसेच केंद्रातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी जगभरातील कलाकारांनी एकत्र येण्याचे आवाहन करतो, अशा प्रकारच्या घटनांमुळे केवळ जीवाला धोका पोहोचणार नाही; तर कलात्मक समुदायाला प्रिय असलेल्या मूलभूत तत्त्वांना सुद्धा धोका पोहोचणार आहे, असा आशय असणारे पत्र नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा स्टूडेंट युनियन (National School of Drama Student Union- NSD) सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा स्टुडन्ट युनियनचे सदस्य म्हणून आम्ही कलाकारांचा आवाज दाबण्याच्या आणि त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीचा तसेच त्यांच्या स्वातंत्र्य रोखण्याच्या प्रयत्नाचा निषेध करतो. ललित कला केंद्रावरील हा हल्ला म्हणजे आपल्या समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी, निर्माते, परावर्तक आणि योगदान देणारा समुदाय म्हणून बांधलेल्या मूलभूत तत्त्वावर हल्ला आहे. या कठीण काळात आम्ही जगभरातील कलाकारांना ललित कला केंद्राच्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन करतो. ही केवळ एक वेगळी घटना नाही, तर जगभरातील कलाकारांना कलात्मक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र उभे करण्याचे आवाहन आहे.

हेही वाचा: चुंबन प्रकरणी एका दिवसात SIT स्थापन होते; तलाठी पेपर फुटीवर का नाही ?

जगभरातील कलाकारांनी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि अभिव्यक्ती निर्भयपणे फुलू शकेल, असे वातावरण टिकून राहावे, यासाठी पुढाकार घ्यायला हवा. ललित कला केंद्रात घडलेली ही घटना केवळ संस्थेच्या पावित्र्याचे उल्लंघन करत नाही तर कलात्मक स्वातंत्र्याच्या मूलतत्त्वांनाही मोठा धोका निर्माण करते. त्यामुळे आम्हाला येथील विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षेची काळजी वाटते, असे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा स्टुडन्ट युनियनने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पत्रात नमूद केले आहे.