देशातील विद्यापीठांमधील मनुष्यबळ विकास केंद्रांच्या नावात बदल; धमेंद्र प्रधान यांची घोषणा

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी ही घोषणा केली. आयोगाच्या मालवीय मिशन या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रधान यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली.

देशातील विद्यापीठांमधील मनुष्यबळ विकास केंद्रांच्या नावात बदल;  धमेंद्र प्रधान यांची घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च शिक्षण संस्थांमधील (Higher Education Institutes) प्राध्यापक-संशोधकांना प्रशिक्षण व अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मनुष्यबळ विकास केंद्र देशभरात कार्यरत आहेत. या केंद्रांचे आता नामकरण करण्यात आले असून यापुढे ही केंद्र मदन मोहन मालवीय शिक्षण प्रशिक्षण केंद्र (Madan Mohan Malviya Teacher Training Centre) म्हणून ओळखली जातील.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी मंगळवारी ही घोषणा केली. आयोगाच्या मालवीय मिशन या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रधान यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. त्यावेळी प्रधान यांनी मनुष्यबळ विकास केंद्रांच्या नावात बदल केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मालवीय मिशनच्या पोर्टलचेही अनावरण केले.

‘नॅक’ बाबत विद्यापीठांचे तोंडावर बोट! देवळाणकरांनी मागवली संलग्नता काढलेल्या महाविद्यालयांची यादी

महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि आरटीएम नागपूर विद्यापीठ या पाच विद्यापीठांमध्ये मनुष्यबळ विकास केंद्र आहेत.

प्रधान यांनी यावेळी बोलताना शिक्षण आणि शिक्षकांच्या कामामध्ये गुणवत्ता उत्कृष्टतेचा समावेश करून त्यांच्यात सर्व स्तरांवर सुधारणा करण्यावर जोर दिला. मालवीय मिशन हा कार्यक्रम निरंतर व्यावसायिक विकास सुनिश्चित करेल. देशभरात १११ मालवीय मिशन केंद्रांच्या माध्यमातून उच्च शिक्षण संस्थांमधील १५ लाख शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल, असे प्रधान यांनी सांगितले.

देशातील शिक्षकांना भारतीय मुल्यांची जाणीव करून देत भविष्यासाठी सज्ज करण्याचा एक प्रयत्न म्हणून हा कार्यक्रम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट साकार करणे, शिक्षकांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि शिक्षकांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. शिक्षकांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी मालवीय मिशनला क्रेडिट सिस्टीमध्ये समावेशित केले जाईल, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j