चुंबन प्रकरणी एका दिवसात SIT स्थापन होते; तलाठी पेपर फुटीवर का नाही ? 

पेपर घेणाऱ्या कंपनीतील कर्मचारी पेपर फुटी प्रकरणी पकडले गेले आहेत. एवढे सगळे घडलेले असताना सुद्धा राज्य सरकार साधी चौकशी सुद्धा करत नाही.

चुंबन प्रकरणी एका दिवसात SIT स्थापन होते; तलाठी पेपर फुटीवर का नाही ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात चुंबन प्रकरणात एका दिवसात SIT स्थापन केली जाते. पण लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न जिथे आहे; त्यासाठी सरकार काहीच करत नाही. तलाठी भरतीमध्ये (Talathi Bharti)पेपर फुटी प्रकरणी सात गुन्हे दाखल झाले आहेत. पेपर घेणाऱ्या कंपनीतील कर्मचारी पेपर फुटी प्रकरणी पकडले गेले आहेत. एवढे सगळे घडलेले असताना सुद्धा राज्य सरकार साधी चौकशी सुद्धा करत नाही. विरोधाकही झोपलेले आहेत, अशी खंत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे 'एक्स' या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील व सुप्रिया सुळे (MP Imtiaz Jalil and Supriya Sule)यांनी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

केंद्र शासनातर्फे संसदेत पेपर फुटी प्रकरणात कायदा मांडण्यात आला. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रातील तलाठी पेपर फुटीचा मुद्दा संसदेत मांडला गेला. राज्य सरकार तलाठी भरती घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यास तयार नाहीत. कारण निवडणुकांच्या तोंडावर चौकशी झाले तर सर्वात मोठा घोटाळा समोर येईल. विरोधकांनाही याबाबत काहीच करता आले नाही. ते फक्त हात बांधून उभे आहेत. लढत आहेत ते फक्त प्रामाणिक विद्यार्थी आणि आमच्या सोबतीला असणारे बोटावर मोजण्याइतके प्रामाणिक राजकारणी, असेही एमपीएससी समन्वय समितीने सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे.

 त्याचप्रमाणे पूर्वी युपी-बिहार मधील घोटाळे गाजत होते.पण आता महाराष्ट्रातील नोकर भरती घोटाळे देशभर गाजत आहेत. शिंदे- फडणवीस- पवार या त्रिकूटांच्या कारंभाराने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. तलाठी भरतीत इतका मोठा घोटाळा होऊनही नियुक्त्या दिल्या जाणार आहे. महाराष्ट्रात पेपर फुटत असताना महाराष्ट्रात पेपरफूटी कायदा लागू करण्यात आलेला नाही.त्यातच घोटाळा झालेल्या तलाठी सारख्या पदभरती रेटून नेण्यात येत आहेत,असेही एक्स सोशल मीडियावर नमूद करण्यात आले आहे.