ब्लिस शाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा; विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे प्रवेश, भरमसाठ शुल्क वसूल

हिंजवडी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिझा अली खान, बुधराणी नॉलेज फाऊंडेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष गौतम बुधराणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ब्लिस शाळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा; विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे प्रवेश,  भरमसाठ शुल्क वसूल
Bogus School representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाने (Education Department) मागील काही महिन्यांपासून अनधिकृत शाळांविरोधात (Bogus Schools) मोहिम उघडली असून या शाळा बंद केल्या जात आहेत. तसेच काही शाळांवर गुन्हेही दाखल केले जात आहेत. पुण्यातील हिंजवडी येथील ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल शाळेवरही (Bliss International School) बुधवारी (दि. १२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या शाळेकडे शासनाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देत भरमसाठ शुल्क वसुल केल्याचा आरोप आहे. (Fraud case against Bliss international School)

जिल्हा परिषदेच्या मारुंजी विभागाचे केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिझा अली खान, बुधराणी नॉलेज फाऊंडेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष गौतम बुधराणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ब्लिस शाळेची प्रत्यक्ष २५ एप्रिल रोजी तपासणी केली असता शाळेकडे कोणत्याही शाळा चालविण्यासाठी आवश्यक शासन मान्यता कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. शाळा सप्टेंबर २०२२ पासून सूरू झाली असून शाळेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग आहेत. ११६ विदयार्थी शिक्षण घेत आहेत, असे आढळून आले.

Maharashtra News : महाराष्ट्राला मिळाले पाच नवीन शैक्षणिक चॅनल; टेस्टिंगचे काम सुरू

विदयार्थांकडून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूल करून विदयार्थी व पालकांची फसवणुक केलेली दिसून येत आहे. ही शाळा अनधिकृत असूनही इतर शाळांना दाखला मागणी करणे, विदयार्थांचे दाखले घेणे, शाळेने शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवून शासनाची फसवणुक केली असल्याचे दिसून आल्याचे तक्रार म्हटले आहे. तसा पाहणी अहवाल दि. २६ एप्रिल रोजी तयार करून गटशिक्षण अधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यांनी शाळेवर फौजदारी कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने तक्रार देत असल्याचे साबळे यांनी नमूद केले आहे.

सप्टेंबर २०२२ ते आजपर्यंत बूधराणी नॉलेज फाऊंडडेशन संचलित ब्लिस इंडीफाय इंटरनॅशनल स्कुल या शाळेचे मुख्याद्यापक, शाळेचे संचालक/मालक, चालक यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी यांची कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता शाळा सूरू केली. विदयार्थांची अनधिकृतरित्या भरती करून, पटावर नोंदणी करून, विदयार्थीकडून अनधिकृतपणे भरमसाठ फी वसूल करून, शाळा अनाधिकृत असून सुध्दा शाळा अधिकृत आहे असे भासविले, असे साबळे यांनी फिर्यादित म्हटले आहे.

मराठी भाषा विद्यापीठाचा आराखडा दोन महिन्यांत; सदानंद मोरे समितीचे अध्यक्ष

इतर शाळांना दाखला मागणी करणे, विदयार्थाचे शाळा सोडल्याचे दाखले घेणे व विदयार्थांचे शाळा सोडल्याचे दाखले देणे, अनधिकृत शाळेचे चालक व मालक यांनी स्वत:चे फायद्यासाठी शाळा अधिकृत आहे, असे भासवून अनधिकृत शाळा अधिकृत म्हणून चालवून, शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवून शासनाची, पालकांची व विदयार्थ्यांची फसवणुक केली असल्याचे दिसून आले. म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सिझा अली खान, बुधराणी नॉलेज फाऊंडेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष/ माललक गौतम बुधराणी, शैक्षणीक संस्थेचे संचालक व चालक यांचेविरुध्द सरकारतर्फे फिर्याद आहे, असे साबळे यांनी म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD