व्यवस्थापन कोटा ठरतोय भ्रष्टाचाराचे कुरण? अधिष्ठाताच लाचप्रकरणी सापळ्यात अडकल्याने खळबळ

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्त अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यंदा या महाविद्यालयाचे दुसरेच शैक्षणिक वर्ष आहे.

व्यवस्थापन कोटा ठरतोय भ्रष्टाचाराचे कुरण? अधिष्ठाताच लाचप्रकरणी सापळ्यात अडकल्याने खळबळ
Bahartratna Atal Bihari Vajpayee Medical college, Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे महापालिकेच्या (PMC) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे (Bahartratna Atal Bihari Vajpayee Medical college) अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार (Dr. Ashish Banginwar) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. तब्बल १६ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी बंगिनवार यांना अटक करण्यात आल्याने महापालिकेमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे पालिकेच्या महाविद्यालयातील व्यवस्थापन कोटा (Management Quota) भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप होऊ लागला आहे.

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्त अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यंदा या महाविद्यालयाचे दुसरेच शैक्षणिक वर्ष आहे. एमबीबीएसच्या १०० जागा असून त्याची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या शंभर जागांपैकी ८५ जागा राज्य कोट्यांतर्गत म्हणजे सीईटी सेलमार्फत गुणवत्तेच्या आधारे भरल्या जातात. तर उर्वरित १५ जागा इन्स्टिट्यूशनल कोट्यातील असून त्यामध्ये व्यवस्थापन कोटा व एनआरआय कोट्याचा समावेश आहे.

शैलजा दराडे यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात

प्रवेशासाठीच्या १५ जागांपैकीच व्यवस्थापन कोट्यातून आपल्या मुलीला प्रवेशासाठी तक्रारदाराने आशिष बंगिनवार यांची भेट घेतली होती. त्यांनी दरवर्षाची शासनमान्य विहीत फी २२ लाख ५० हजार रुपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी १६ लाख लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीची पडताळणी केली असता बंगिनवार यांनी प्रवेशासाठी तडजोडीअंती १६ लाख रुपये लाच मागून त्यापैकी पहिला हप्ता १० लाख रुपये कार्यालयात स्वीकारले.

लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. त्यामुळे बंगिनवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत. या कारवाईमुळे महापालिकेसह आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

MBBS Admission : राज्यात ९०० जागा पुन्हा वाढल्या, दुसऱ्या फेरीपासून मिळणार प्रवेश

दरम्यान, आम आदमी पक्षाने व्यवस्थापन कोट्यावर आक्षेप घेतला आहे. पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे आणि हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. मुंबई महानगरपालिकेची तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि तिथल्या सर्व जागा या राज्य सरकार द्वारे मेरिट वर भरल्या जातात. तिथे कोणताही मॅनेजमेंट कोटा नाही.

इन्स्टिट्यूशनल कोट्या मधून प्रवेश देण्यासाठी मान्यता प्राप्त फीव्यतिरिक्त १६ लाख रुपयांची लाच ही कोणा कोणापर्यंत पोहोचणार होती? आयुक्त, आरोग्य प्रमुख यांचे व राजकीय नेत्यांचे लागेबांधे होते का? पुण्यातील या मनपाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इन्स्टिट्यूशनल कोट्यातील सर्व १५ जागांवर असे प्रकार सर्रास होतात का? याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे डॉ. अभिजित मोरे यांनी केली आहे.

शुल्कही इतर महाविद्यालयांच्या तुलनेत अधिक

पुण महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शुल्कही इतर शासकीय महाविद्यालये तसेच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांच्या तुलनेत अधिक आहे. यावर्षी ट्यूशन फी ६ लाख ८१ हजार ८१८ रुपये, डेव्हलपमेंट फी ६८ हजार १८२, रिफंडेबल डिपॉझिट ३० हजार आणि वसतिगृह व वाहतुक शुल्क ८० हजार असे एकूण जवळपास ८ लाख ६० हजार रुपये खुल्या गटातील एका विद्यार्थ्याकडून शुल्क घेतले जाते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo