आमदार पवार फडणवीसांना भेटले अन् काही तासांतच MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!

आयोगाकडून मंगळवारी (दि. २९) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांसाठी सुचना प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.

आमदार पवार फडणवीसांना भेटले अन् काही तासांतच MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीसाठी (Police Recruitment) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा दि. २ डिसेंबर रोजी होणार होती. आता प्रशासकीय कारणास्तव दि. १० डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

आयोगाकडून मंगळवारी (दि. २९) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षेबाबत उमेदवारांसाठी सुचना प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर २४ तासांच्या आत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रक आयोगाने काढले आहे. त्यामुळे सर्व तयारी पूर्ण झालेली असताना अचानक परीक्षा पुढे का ढकलली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

IAS, IPS व्हायचं होतं पण..! निरीक्षक असलेल्या २५ वर्षीय शुभमची आत्महत्या

 

दरम्यान, भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. याबाबतचे ट्विट करत पवार यांनी माहिती दिली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचे ट्विट केल्यानंतर काही तासांत याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे.

 

नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणारे जवळपास ७५० SRPF व पोलीस जवान तातडीच्या कर्तव्यावर असल्याने ते परीक्षेपासून वंचित राहत होते. ही बाब काही जवानांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री यांनी ही परीक्षा १५ दिवस पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे, असे ट्विट पवार यांनी केले होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO