Supreme Court : मुलांनी कोणत्या विषयाचा अभ्यास करावा, हे आम्ही ठरवू शकत नाही!

शालेय अभ्यासक्रमात शालेय मुलांचे हृदयविकारापासून जीव वाचवण्यासाठी प्रभावी असलेल्या सीपीआर तंत्राचा समावेश करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Supreme Court : मुलांनी कोणत्या विषयाचा अभ्यास करावा, हे आम्ही ठरवू शकत नाही!
Supreme Court

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय मुलांचा (School Children) अभ्यासक्रम (School Curriculum) कसा असावा हे सरकारने ठरवायचे आहे. अशा असंख्य गोष्टी असू शकतात ज्या मुलांना त्यांच्या अभ्यासादरम्यान माहित असणे आवश्यक आहे, परंतु न्यायालय त्या सर्वांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश  देऊ शकत नाही, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मांडली आहे.

 

शालेय अभ्यासक्रमात शालेय मुलांचे हृदयविकारापासून जीव वाचवण्यासाठी प्रभावी असलेल्या सीपीआर तंत्राचा समावेश करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सुनावणीदरम्यान,  मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी  सांगितले की, "याचिकेत करण्यात आलेली मागणी सरकारच्या धोरणात्मक मुद्द्यांमध्ये येते.’’

IAS, IPS व्हायचं होतं पण..! निरीक्षक असलेल्या २५ वर्षीय शुभमची आत्महत्या

 

शालेय मुलांचा अभ्यासक्रम काय असावा हे सरकारने ठरवायचे आहे. अशा असंख्य गोष्टी असू शकतात ज्या मुलांना त्यांच्या अभ्यासादरम्यान माहित असणे आवश्यक आहे, परंतु न्यायालय त्या सर्वांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश  देऊ शकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही यासंदर्भात सरकारला निवेदन देऊ शकता, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

 

सीपीआर शिकवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर याचिकाकर्त्याने मागणी केली होती की, "अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता, शाळांमध्ये मुलांना हृदयविकाराशी संबंधित शिक्षण दिले जावे.  आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरच्या माध्यमातून रुग्णाला कशी मदत करता येईल, याचे शिक्षण शाळेत द्यावे."  मात्र न्यायालयाने यावर सुनावणी घेण्यास नकार दिला. मुलांनी काय वाचावे हे आम्ही ठरवू शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO