MPSC कडून विमा सहायक संचालक पदांसाठी 'या' तारखेला मुलाखती

सहायक संचालक , सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९ मे २०२४ रोजी आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

MPSC कडून विमा सहायक संचालक पदांसाठी 'या' तारखेला मुलाखती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगा (MPSC) कडून विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance), सामान्य राज्य सेवा, गट-अ (General State Service, Group-A) संवर्गाच्या मुलाखती येत्या ९ मे रोजी आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात (office of the Commission in Mumbai) आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Commission official website) प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

विमा सहायक संचालक, राजपत्रित सामान्य राज्य सेवा, गट-अ पद संवर्गाच्या पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननी अंती मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ९ मे रोजी आयोगाच्या मुंबई कार्यलयात आयोजित करण्यात आले आहेत, असे आयोगाकडून प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ पद संवर्गाच्या मुलाखतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करता येईल. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. 

विमा सहायक संचालक निवड प्रक्रियेनुसार, मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील मुलाखत फेरीत उपस्थित राहावे लागेल. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार वेळापत्रक तपासू शकतात आणि त्यांना रोल नंबर, मुलाखतीची तारीख आणि वेळेनुसार उपस्थित राहावे लागेल. अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या रोल नंबर आणि नावानुसार उमेदवार मुलाखतीची तारीख आणि वेळ पाहू शकतात.