नवोदय विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून पात्र विद्यार्थ्यांना समितीच्या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. त्यासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

नवोदय विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू
Jawahar Navodaya Vidyalaya Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाअंतर्गत (Education Department) असलेल्या नवोदय विद्यालय समितीकडून देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये (Jawahar Navodaya Vidyalaya) इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश चाचणीद्वारे प्रवेश दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे असून पात्र विद्यार्थ्यांना समितीच्या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील. त्यासाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याने शैक्षणिक सत्र २०२२-२३ (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ सत्र) / २०२२ (जानेवारी ते डिसेंबर २०२२ सत्र) या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीचा अभ्यास, जिथे जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शासकीय/ शासनाकडून मान्यताप्राप्त शाळेतून केलेला असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : संच मान्यतेचे काय होणार? प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करा!

त्याचप्रमाणे उमेदवाराचा जन्म ०१.०६.२००६ ते ३१.०७.२००८ दरम्यान (दोन्ही तारखांसह) झालेला असावा. अभ्यासक्रम आणि निवड निकषांसाठी NVS ची अधिसूचना संकेतस्थळावर पाहता येईल. इयत्ता दहावी शिकत असलेल्या शाळेचा आणि राहण्याचा जिल्हा सारखाच असेल, तरच उमेदवाराचा जिल्हास्तरीय गुणवत्तेसाठी विचार केला जाईल.

अशी असेल निवड चाचणी -

  • मानसिक क्षमता, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान
  • OMR आधारित वस्तुनिष्ठ प्रकार चाचणी. द्विभाषिक प्रश्नपत्रिका (हिंदी आणि इंग्रजी)

नवोदय विद्यालयाची वैशिष्ट्ये -

  • सहावी ते बारावीपर्यंत सह-शैक्षणिक आणि पूर्णपणे निवासी दर्जेदार शिक्षण.
  • प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना चांगल्या दर्जाचे उत्तीर्ण आधुनिक शिक्षण.
  • सी.बी.एस.ई. बोर्ड शी संलग्न.
  • मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, सहसा ग्रामीण भागात प्रस्थापित विद्यालय.
  • मोफत निवास आणि भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आदीसह मोफत शिक्षण.
  • सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सह-अभ्यासक्रम उपक्रम, क्रीडा आणि खेळ, NCC, NSS, योग इत्यादींवर लक्ष केंद्रित प्रोत्साहन

ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ : www.navodaya.gov.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2