JEE Advanced परीक्षेची तारीख जाहीर; एप्रिलमध्ये सुरू होणार प्रक्रिया

JEE Advanced २०२४ ची परीक्षा २६ मे रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पेपर पहिला सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत घेण्यात येईल.

JEE Advanced परीक्षेची तारीख जाहीर; एप्रिलमध्ये सुरू होणार प्रक्रिया
JEE Advanced 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  (IIT) मद्रासमार्फत संयुक्त प्रवेश परीक्षा JEE Advanced 2024 परीक्षा घेतली जाणार असून वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ही परीक्षा दि. २६ मे रोजी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. इच्छूकांना www.jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक पाहता येईल.

 

JEE Advanced २०२४ ची परीक्षा २६ मे रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पेपर पहिला सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरा पेपर दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत घेण्यात येईल. नोंदणी प्रक्रिया दि. २१ एप्रिल २०२४ पासून सुरू होईल. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता संपेल.

 

नोंदणीकृत उमेदवारांनी फी भरण्याची अंतिम तारीख ६ मे २०२४ आहे. तर प्रवेशपत्र १७ मे रोजी जारी केले जाईल आणि २६ मे २०२४ पर्यंत डाउनलोड केले जाऊ शकते. आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) २०२४ साठी ऑनलाइन नोंदणी ९ जूनपासून सुरू होईल आणि १० जून २०२४ रोजी संपेल. AAT परीक्षा १२ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. याचे निकाल १५ जून २०२४ रोजी जाहीर होतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO