MBBS Admission : दुसऱ्या व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर, सप्टेंबरही प्रवेशात जाणार

एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाल्याने आता पुढील फेऱ्यांसाठी कमी कालावधी उरला आहे.

MBBS Admission : दुसऱ्या व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर, सप्टेंबरही प्रवेशात जाणार
MBBS Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून (CET Cell) सोमवारी (दि. २१) एमबीबीएस (MBBS) व बीडीएस (BDS) प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. २२) पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयावरील दावा (Seat Resign) सोडता येणार आहे. तर दुसऱ्या फेरीची निवड यादी २९ ऑगस्ट रोजी प्रसिध्द केली जाईल. तिसरी फेरी २० सप्टेंबरपर्यंत सुरू चालणार आहेत.

एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाल्याने आता पुढील फेऱ्यांसाठी कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे सीईटी सेलने शनिवार व रविवारीही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या सुचना महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना सुट्टीच्या दिवशीही प्रवेशाचा कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे.

शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार

दुसरी फेरी दि. २३ ऑगस्टपासून सुरू होत असून यादिवशी रिक्त जागा प्रसिध्द केल्या जाणार आहेत. त्यानंतर २४ ते २८ ऑगस्ट या कालावधीत नव्याने पसंतीक्रम भरावे लागतील. तर २९ ऑगस्ट रोजी निवड यादी प्रसिध्द करावी लागेल. त्यानुसार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

तर तिसरी फेरी ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. तर त्याच रिक्त जागांची माहितीही दिली जाईल. त्याआधारे विद्यार्थ्यांना दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी पसंतीक्रम नोंदविता येतील. तर दि. १५ सप्टेंबर रोजी निवड यादी प्रसिध्द केली जाईल. दि. १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागेल.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

पहिल्या फेरीतील महाविद्यालयावरील दावा सोडणे (Seat Resign) – दि. २२ ऑगस्ट (सायं. ५.३० पर्यंत)

रिक्त जागा प्रसिध्द करणे – दि. २३ ऑगस्ट

नव्याने पसंतीक्रम भरणे – दि. २४ ते २८ ऑगस्ट

निवड यादी प्रसिध्द करणे – २९ ऑगस्ट

महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे – दि. ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर

दुसऱ्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयावरील दावा सोडणे – दि. ८ सप्टेंबर (सायं. ५.३० पर्यंत)

तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक –

नोंदणी फी जप्त केलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी – दि. ९ व १० सप्टेंबर

नोंदणी शुल्क भरणे – दि. ९ ते ११ सप्टेंबर

नोंदणीकृत विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करणे – दि. १२ सप्टेंबर

तात्पुरती राज्य गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे – १२ सप्टेंबर

रिक्त जागांची स्थिती प्रसिध्द करणे – दि. १२ सप्टेंबर

पसंतीक्रम भरणे – दि. १३ व १४ सप्टेंबर

निवड यादी प्रसिध्द करणे – दि. १५ सप्टेंबर

प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे – १६ ते २० सप्टेंबर

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo