कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची कार्यकारिणी बदलली

प्रा. लक्ष्मण रोडे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर कार्याध्यक्षपदी प्रा. राहुल गोलांडे आणि सरचिटणीसपदी प्रा. विक्रम काळे यांची निवड करण्यात आली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची कार्यकारिणी बदलली
Junior College Teachers Organisation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक (Junior College Teachers Organisation) संघटनेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत कार्यकारिणी बदलण्यात आली असून नवीन पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. त्यानुसार प्रा. लक्ष्मण रोडे (Prof. Laxman Rode) यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर कार्याध्यक्षपदी प्रा. राहुल गोलांडे (Prof. Rahul Golande) आणि सरचिटणीसपदी प्रा. विक्रम काळे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या सभेमध्ये वर्ष २०२३ ते २०२६ साठी नूतन जिल्हा कार्यकारणीची आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य महासंघाचे माजी सरचिटणीस प्रा. पंडितराव पाटील आणि जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुधाकर पडवळ आणि निवडणूक निरीक्षक म्हणून महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. भास्करराव जराड उपस्थित होते. सभेमध्ये २०१९ ते २०२३ अखेर सेवानिवृत्त झालेल्या आणि पुरस्कार प्राप्त केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचा : स्पर्धा परिक्षांच्या क्लासेसचा किळसवाणा बाजार! महेश झगडेंना विश्वासच बसला नाही...

सर्वसाधारण सभेला पुणे जिल्ह्याचे माजी सरचिटणीस प्रा. दूसिंग, जिल्ह्याचे सल्लागार प्रा. एस. टी. पवार, प्रा. एम. एस. शहापुरे, प्रा. सुधाकर पडवळ यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. धनंजय कुलकर्णी, संघटनेचे माजी समन्वयक प्रा. सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा. सुनील वर्पे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉ. तुकाराम साळुंखे आदी उपस्थित होते.

अशी आहे नूतन कार्यकारिणी (वर्ष २०२३-२६) :

१) अध्यक्ष - प्रा. लक्ष्मण रोडे

२) कार्याध्यक्ष -  प्रा. राहुल गोलांदे

३) सरचिटणीस - प्रा. विक्रम काळे

४) उपाध्यक्ष - प्रा. चंद्रकांत नांगरे, प्रा. बब्रुवाहन घोडके, प्रा. तारा पवार

५) सहचिटणीस - प्रा. गोपीचंद करंडे

६) सहचिटणीस - प्रा. डी. के. मंडलिक

७) कोषाध्यक्ष - प्रा. आदिनाथ दहिफळे

८) समन्वयक -  प्रा. राजेंद्र निकत

९) समन्वयक - प्रा. राजकुमार मुळे