अमेरिकेतून एका दिवसात २१ भारतीय विद्यार्थी  हद्दपार 

अटलांटा, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासली. यानंतर त्यांना काही काळ ताब्यातही घेण्यात आले आणि नंतर परतण्यास सांगितले.

अमेरिकेतून एका दिवसात २१ भारतीय विद्यार्थी  हद्दपार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अमेरिकेतून (America) एका दिवसात २१ भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Students) परत पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हिसा (Visa) आणि कागदपत्रांमधील चूक असल्याचे सांगत या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात  आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांतपणे देशातून परत न गेल्यास गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. 

अटलांटा, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासली. यानंतर त्यांना काही काळ ताब्यातही घेण्यात आले आणि नंतर परतण्यास सांगितले. परत जाण्यासाठी कोणतेही कारण दिले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यामुळे कागदपत्रांमध्ये काहीतरी कमतरता असल्याचे विद्यार्थ्यांना वाटले. हे विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत.

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय; विशेष अभ्यासक्रमाची घोषणा

विद्यार्थ्यांनी दावा केला की, त्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण होती आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ते अमेरिकेला जात होते. या विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटही अधिकाऱ्यांनी तपासले. तसेच त्यांचे लॅपटॉप आणि सोशल मीडिया अकाउंटही तपासण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आले आहे. ते बहुतेक मिसुरी आणि साऊथ डकोटा विद्यापीठात शिकण्यासाठी जात होते.

विमानतळावर, विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास, व्हिसा मुलाखत, कर्ज आणि प्रवेशासाठी त्यांनी मदत घेतलेल्या सल्लागारांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीला परत जाईपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्यात आले होते. दूतावास आणि विद्यापीठाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही कारवाई केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गेल्या आठवड्यात हजारो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी रवाना झाले होते. दरम्यान, या मुद्द्यावर अमेरिका किंवा भारत सरकारकडून अद्याप  कोणतेही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo