अपघाती मृत्यू झालेला सारंग दहावीत टॉपर; मृतदेहासमोर आईने वाजवल्या टाळ्या, शिक्षणमंत्री रडले

आईसोबत रिक्षाने जात असताना ६ मे रोजी त्यांचा अपघात झाला होता. पुढील बारा दिवस सारंगवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण बुधवारी (१७ मे) त्याला मृत घोषित करण्यात आले.

अपघाती मृत्यू झालेला सारंग दहावीत टॉपर; मृतदेहासमोर आईने वाजवल्या टाळ्या, शिक्षणमंत्री रडले
B R Sarang

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आईसोबत रिक्षातून चाललेल्या सारंगचा (B R Sarang) अपघात (Accident News) झाला अन् त्यातच त्याच्यावर काळाने घाला घातला. बारा दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली. पण त्यानंतर दोनच दिवसांनी केरळ राज्य मंडळाचा (Kerala State Board) दहावीचा निकाल लागला. सर्व विषयांत तो टॉपर (10th Topper) असल्याची घोषणा स्वत: शिक्षणमंत्र्यांनी (Education Minister) केली. त्यावेळी त्यांनाही भावना अनावर झाल्या. तर निकालाच्या दिवशीच सारंगचे पार्थिव कुटुंबाला सोपविण्यात आले. त्यावेळी आईने टाळ्या वाजवून लेकाचे कौतुक केले अन् उपस्थितींचा अश्रूंचा बांध फुटला.

बिनेश कुमार आणि रजनी यांचा सारंग हा अवघ्या सोळा वर्षांचा मुलगा. आईसोबत रिक्षाने जात असताना ६ मे रोजी त्यांचा अपघात झाला होता. पुढील बारा दिवस सारंगवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण बुधवारी (१७ मे) त्याला मृत घोषित करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने त्याचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर आई-वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://eduvarta.com/

सारंगच्या अवयवदानाने सहा जणांना जीवनदान मिळाले. त्यामुळे त्याचा मृतदेह शुक्रवारी (१८ मे) कुटुंबियांना सोपविण्यात आला. त्याचदिवशी दहावीचा निकालही जाहीर करण्यात आला. सारंगला सर्व विषयांमध्ये ए प्लस गुण मिळाल्याचे शिक्षणमंत्री व्ही. सिवनकुट्टी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी त्यांच्याही डोळ्यातून अश्रू आले.

एकीकडे निकाल जाहीर होत असताना सारंगचा मृतदेह घरी आणण्यात आला. त्यानंतर लगेचच आई रजनी यांनी मुलाने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल टाळ्या वाजविल्या. अपघात झाला त्यावेळी सारंग आणि आई सोबतच होते. ही त्या दोघांची अखेरची भेट होती. त्यामुळे हा प्रसंग पाहून उपस्थितांना मन हेलावून गेले. सारंग हा अतिंगल येथील शासकीय मुलांच्या शाळेत शिकत होता. तो उत्कृष्ट फुटबॉलपटूही होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2