विपरीत परिस्थितीशी झगडा देत कचरावेचक कामगारांच्या मुलांचे नेत्रदीपक यश

कोमल आणि समाधान म्हात्रे या दोघी चुलत बहिणी आहेत. दोघींचे पालक कचरा वेचक कामगार आहेत.  कोमल ६७. ५ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे, तर समाधान हिला ६५.३३ टक्के गुण मिळाले आहेत.

विपरीत परिस्थितीशी झगडा देत कचरावेचक कामगारांच्या मुलांचे नेत्रदीपक यश
HSC Result Updates

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

HSC Result Update : कचरावेचक म्हणून काम करत मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अनेक पालकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरला. इयत्ता बारावीच्या निकालात (HSC Result) कचरावेचकांच्या मुलांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळल्याची भावना त्यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केली. (Maharashtra HSC Result)

बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवणारी दिशा बचुटे ही चाकण येथील एका वस्तीत राहते. ती श्री शिवाजी विद्यामंदिर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत आहे. दिशाचे आई-वडील दोघे कचरावेचक कामगार आहेत. 'एज्युवार्ता' शी बोलताना दिशा म्हणाली, "मला सीए व्हायचे आहे. त्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्यायला मी तयार आहे." तर १२वी मध्ये  ६८ टक्के मिळवणारी काजल घोडे म्हणाली, "मी पूर्णपणे सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रित केले. कॉलेजवरून घरी आल्यानंतर घरी आईला थोडी कामात मदत करून दिवस मिळेल तितका वेळ अभ्यास करायचे. रात्री नियमिपणे ३ ते ४ तास अभ्यास करत होते." काजलचे आई वडील दोघे कचरावेचक कामगार आहेत. काजल विठ्ठलराव शिवकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

वडील अर्धांगवायूने आजारी अन् आई कचरावेचक; अडचणींवर मात करत प्रज्वलाचे उत्तुंग यश

कोमल आणि समाधान म्हात्रे या दोघी चुलत बहिणी आहेत. दोघींचे पालक कचरा वेचक कामगार आहेत.  कोमल ६७. ५ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे, तर समाधान हिला ६५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. या दोघी ग्यानबा सोपान विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. बारावीमध्ये कला शाखेतून ६९.३३ गुण मिळवणारा बालाजी सांगत होता,"आई वडिलांचे कष्ट आणि आमच्या नामदेव काळभोर सरांचे मार्गदर्शन यामुळेच १२ वी ला चांगले गुण मिळाले. काळभोर सरांनी आम्हाला अभ्यासाची विशिष्ट पद्धत सांगितली होती. ती फॉलो करत अभ्यास केला." बालाजीला भविष्यात पोलिसात भरती व्हायचे आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांचे ‘दिव्य’ यश; एकूण निकालात आघाडी

कोमल पोळ या विद्यार्थिनीने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत १२वी मध्ये ४१  टक्के गुण मिळवले आहेत.  कोमलच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तिच्या आई मीना पोळ यांच्या खांद्यावर घराची सर्वच जबाबदारी आली. कोमलच्या आई वाघोली येथे कचरा गोळा करायचे काम करू लागल्या. एवढ्या महागाईमध्ये दोन मुलींचा शिकण्याचा खर्च भागवणे अवघड होते. शेवटी कोमलने आईला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. कोमल काही घरात कामे करू लागली, वस्तीत शिकवणी घेऊ लागली. पुढे कोमल ला B,com करून चांगला जॉब मिळवून आईचे कष्ट कमी करायचे आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo