शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार

शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेण्याची शासनाची भूमिका आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करू द्यावे.कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी त्यांचा वापर करू नये.

शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षकांनी शालेय पोषण आहार योजनेच्या (School Nutrition Scheme) ऑडिटवर बहिष्कार घातल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने (Maharashtra State Primary Teachers Central Association) केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (Navbharat Literacy Programme) केल्या जाणा-या निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय (Decision to boycott survey of illiterates ) घेतला आहे.या बहिष्कारात राज्यातील सर्व शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांच्या सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली .मात्र, शिक्षकांना निवडणुकीच्या कामासह अनेक शालाबाह्य कामे करावी लागत आहेत.त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच उरत नाही.त्यामूळे राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणावर बहिष्कार घातला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बहिष्काराबाबतचे निवेदन राज्याच्या शिक्षण योजना विभागाचे  संचालक महेश पालकर यांना दिले आहे. 

शरद पवार यांनी घेतला सीबीएसई बोर्डाचा समाचार

राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम  देऊ नये,फक्त निवडणूका व जनगणना यासारखी राष्ट्रीय महत्वाची कामे सुट्टीच्या दिवशी व अशैक्षणिक कालावधीत द्यावीत.मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांच्या माध्यमातून निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.मात्र, शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेण्याची शासनाची भूमिका आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करू द्यावे.कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी त्यांचा वापर करू नये, आशा प्रकारची व्यवस्था व्हावी,असे महेश पालकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

शालाबाह्य कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम

" राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रमाण फार व्यस्त आहे.राज्यात हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात शिक्षकांना अनेक शालाबाह्य कामे दिली जात आहेत.या उलट खासगी शाळांमधील शिक्षकांना कोणतेही सर्वेक्षणाचे काम नसते.समाजाचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे व शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलता चालला आहे.शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळायला हवा.शालाबाह्य कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे."

- राजेश सुर्वे , राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo