उच्च शिक्षणाच्या सामर्थ्यांवर भारत विश्वगुरू बनेल

‘भारतीय उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ कार्यशाळेेचा जाहिरनामा  

उच्च शिक्षणाच्या सामर्थ्यांवर भारत विश्वगुरू बनेल

पुणे :“ उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता वाढविणे, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक आणि परवडणारी उच्च शिक्षण प्रणाली तयार करणे, संशोधन आणि नवोपक्रमातील उत्कृष्टतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे, शाश्वतता आणि सामाजिक सुधारणेचा पाठपुरावा करणे, शिक्षणातील आंतरराष्ट्रीयीकरण आणि जागतिक कनेक्शनेचे मूल्ये प्रदर्शित करणे व भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार व प्रसार करणे. असा जाहिरनामा कुलगुरूंच्या परिषदेत सर्वानुमते घोषित केला. त्यानुसार कंसोर्टियम फॉर अ‍ॅडव्हानसिंग इंडियन टर्शरी एज्यूकेशन (साईट) संघटना अस्तिवात आणली. या द्वारे उच्च शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडविण्याचे कार्य साईट द्वारे केले जाणार आहे. अशी माहिती आयआयटी कानपुरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘भारतीय उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ या विषयावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ तर्फे आयोजित करण्यात आलेली तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेते ते बोलत होते.
यावेळी वर्माट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमेला, कुलगुरू डॉ. संविक भट्टाचार्य, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर व डॉ. सुब्बाराव उपस्थित होते.
डॉ. संजय धांडे म्हणाले, भारतातील उच्च शिक्षणाच्या सामर्थ्यांची जाणीव करून देण्यासाठी कृती करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार राष्ट्र पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल. न्याय, शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण जगाची प्रगती करणार्‍या जागतिक समुदायामध्ये एक आदरणीय भागीदारी म्हणून सहभागी होणार आहोत.
डॉ. सुरेश गरिमेला म्हणाले,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटल्याप्रमाणे शिक्षणाद्वारे भारत विश्वगुरू बनणार आहे. आज संपूर्ण जगात भारतीय शिक्षण तज्ञांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी शिक्षणक्षेत्रात नव नवीन प्रयोग केले आहेत.”
राहुल कराड म्हणाले,“देश विदेशातील कुलगुरूंच्या विचारांच्या आदान प्रदानामुळे  भारतीय शिक्षणाचा स्तर खूप उंचावेल. हे शिक्षण क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल असेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार्‍या विभिन्न समस्यांचे निरासण कसे करता येईल. तसेच भारतीय शिक्षण पद्धतीत एकच प्रवेश परिक्षेचे कॅलेन्डर नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात बदल घडणे आवश्यक आहे.”
डॉ. संविक भट्टाचार्य म्हणाले,“उच्च शिक्षणासाठी भविष्यात भारतात खूप मोठी संधी आहे. त्या संधीचा लाभ खाजगी विद्यापीठांनी घ्यावा. खाजगी आणि नॉन गर्व्हनमेंट विद्यापीठांसमोर सध्या अनेक आव्हाणे आहेत. परंतू या परिषदेनंतर ‘साईट’ या संकल्पानुसार शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडणार आहे.”