साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांना मिळणार व्यासपीठ; यंदाचे विद्यार्थी साहित्य संमेलन सोलापूरात

साहित्य आणि लिखाणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संमेलनात सहभागी होता येईल. संमेलनात सहभागासाठी २५ वर्षे ही वयोमर्यादा असेल.

साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांना मिळणार व्यासपीठ; यंदाचे विद्यार्थी साहित्य संमेलन सोलापूरात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

पुण्यातील राष्ट्रीय कला मंचच्या (Rashtriy Kala Manch) वतीने मागील १९ वर्षांहून अधिक काळापासून ‘प्रतिभा संगम’ (Pratibha Sangam) हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीचे २० वे विद्यार्थी साहित्य संमेलन दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

 

महाविद्यालयाच्या परिसरातील अस्तंगत होत चाललेले सांस्कृतिक आणि वाड्मयीन वातावरण विकसित करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये साहित्य विषयक आवड वाढविण्यासाठी आणि साहित्यिक विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कला मंचने ‘प्रतिभा संगम’ हा उपक्रम हाती घेतला आहे. साहित्य आणि लिखाणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संमेलनात सहभागी होता येईल.

दत्तक शाळा योजनेचा जीआर आला; शाळेला नाव अन् ३ कोटींपर्यंतच्या वस्तुंची देणगी...

 

संमेनलानामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांतून साहित्याचे सादरीकरण करता येईल. त्यामध्ये कविता, कथाकथन, कथा लेखन, वैचालिक लेख, ललित लेख, संहिता लेखन आदी साहित्य प्रकाराचा समावेश आहे. संमेलनात सहभागासाठी २५ वर्षे ही वयोमर्यादा असेल.

 

ग्रंथदिंडी, उदघाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयीन वाड्मय मंडळ प्रमुख, प्राध्यापकांचे एकत्रीकरण, मुलाखत, काव्य निर्मिती, गटनिहाय चर्चा, सादरीकरण, कविसंमेलन, कथाकथन, परिचर्चा व समारोप असे संमेलनाचे स्वरुप असेल. संमेलनात उत्कृष्ठ साहित्याला पुरस्कारही दिले जाणार आहे. तसेच सर्व प्रकारातील विद्यार्थी साहित्यिकांचा सहभाग, शिस्तपालन व साहित्य गुणवत्ता यांचे मुल्यमापन करून सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या  महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय राज्यस्तरीय चषक देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय कला मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक प्रसाद जाधव व प्रतिभा संगम २०२३ चे निमंत्रक दुर्गेश साठवणे यांनी दिली. याबाबतचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडूनही काढण्यात आले असून सर्व संलग्न महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ०२०-२४४३६४०० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0