धक्कादायक : विद्यापीठात नग्न फिरवल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या

स्वप्नदीप कुंडू (१८) या विद्यार्थ्यावर  लैंगिक अत्याचार झाला. त्याच्या  मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी, त्याला  वसतिगृहाच्या ७० क्रमांकाच्या खोलीत कपडे उतरवण्यास भाग पाडले गेले.

धक्कादायक : विद्यापीठात नग्न फिरवल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या
Jadavpur University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या कोलकातातील जाधवपूर विद्यापीठातील (Jadavpur University) विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक  बाबी उघड झाल्या आहेत. आत्महत्येपूर्वी त्या विद्यार्थ्याची रॅगिंग (Ragging) करण्यात आली होती. त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता, तसेच त्याला विद्यापीठाच्या आवारामध्ये नग्न फिरवण्यात आले होते. या घटनेनंतरच त्या विद्यार्थ्याने आत्महत्या (Student Suicide) केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. सौरभ चौधरी, मोनोतोष घोष आणि दीपशेखर दत्ता या तीन मुख्य आरोपींविरोधात रॅगिंगचे आरोप निश्चित करावेत, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. या घटनेचा पुढील तपास आता CID कडे सोपवण्यात आला आहे. 

SPPU News : विद्यापीठाचे उपहारगृह अडकले लाल फितीत; व्यवस्थापन परिषद लक्ष देणार का ?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात ९ ऑगस्टच्या रात्री स्वप्नदीप कुंडू (१८) या विद्यार्थ्यावर  लैंगिक अत्याचार झाला. त्याच्या  मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी, त्याला  वसतिगृहाच्या ७० क्रमांकाच्या खोलीत कपडे उतरवण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये  त्याला  नग्न अवस्थेत फिरवण्यात आले. या विद्यार्थ्याला तो ‘गे’ असल्याचे वारंवार हिणवण्यात येत होते. या घटनेनंतर विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.  

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत विद्यापीठाच्या  माजी विद्यार्थ्यांसह १३ जणांना अटक केली आहे. १२ आरोपींना आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे, तर एकाला पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करू त्यांची दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याने सर्व आरोपी विद्यार्थ्यांचा एक वॉट्सअप ग्रुप बनवला होता. या ग्रुपवर पोलिसांची कशी दिशाभूल करता येईल, त्यांना कशी चुकीची माहिती द्यायची याचा कट रचण्यात आला होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo