ओपन अँड डिस्टन्स लर्निंगचे प्रवेश 31 मार्चपर्यंत ; UGC कडून मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांची यादी प्रसिध्द

UGC च्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

ओपन अँड डिस्टन्स लर्निंगचे प्रवेश 31 मार्चपर्यंत ; UGC कडून मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांची यादी प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशाची अंतिम मुदत (Entry Deadline) जवळ येत असताना, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) प्रोग्राम ऑफर करण्यासाठी मान्यताप्राप्त उच्च शैक्षणिक संस्थांची (HEIs) एक यादी जारी केली आहे. UGC च्या अधिकृत वेबसाईटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

इच्छूक विद्यार्थी यादीतील एकूण 80 विद्यापीठांसह ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण पद्धतींमध्ये ऑफर केलेले विविध अभ्यासक्रम पाहू शकतात. 2024 या शैक्षणिक सत्रासाठी ODL आणि ऑनलाइन कार्यक्रमांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 निश्चित करण्यात आली आहे.

यूजीसीच्या नियमांच्या आधारे ही  यादी जाहीर करण्यात आली आहे. UGC ने  (ओपन अँड डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रॅम्स अँड ऑनलाइन प्रोग्राम्स) रेग्युलेशन, 2020 आणि त्यातील सुधारणांच्या आधारे ODL प्रोग्राम ऑफर करणाऱ्या विद्यापीठांची ची यादी तयार केली.

हे अभ्यासक्रम ऑफर करणाऱ्या शिक्षण संस्थानी  सीट कोटा आणि शैक्षणिक वर्षाच्या वैधतेसह नियामक प्राधिकरणांनी दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे निर्देश UGC ने दिले आहेत.