देशात सुरु झाली पहिली AI शाळा; विद्यार्थ्यांना मिळणार अद्ययावत ज्ञान

AI शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक विद्याशाखा, चाचणीचे विविध स्तर, अभियोग्यता चाचण्या, समुपदेशन, करिअर नियोजनात मदत आणि स्मरणशक्ती वाढवण्यावर भर दिला जाईल.

देशात सुरु झाली पहिली AI शाळा; विद्यार्थ्यांना मिळणार अद्ययावत ज्ञान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जगभरात प्रत्येकालाच सध्या कृत्रिम बुध्दिमत्तेविषयी (Artificial Intelligence) कुतुहल आहे. यापार्श्वभूमीवर आता देशात पहिली कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) शाळा सुरू करण्यात आली आहे. केरळची (Kerala) राजधानी तिरुअनंतपुरममध्ये ही शाळा (AI School) सुरू झाली असून शाळेचे नाव शांतीगिरी विद्याभवन असे आहे. ही शाळा ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल.

AI शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अनेक विद्याशाखा, चाचणीचे विविध स्तर, अभियोग्यता चाचण्या, समुपदेशन, करिअर नियोजनात मदत आणि स्मरणशक्ती वाढवण्यावर भर दिला जाईल. AI शाळा ही अध्ययन आणि अध्यापनाच्या कामात कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) आणि प्रगत तंत्रज्ञान प्रणालीची मदत घेईल.

झेडपी शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. येथे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने  मशीन लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि डेटा विश्लेषण यासारख्या शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये अभ्यासक्रम डिझाइन, वैयक्तिकृत शिक्षण, मूल्यांकन आदी विषय शिकवले जातील.

i-Learning Engine (ILE) अमेरिका आणि वैदिक ई-स्कूल यांच्या सहकार्याने ही शाळा उघडण्यात आली आहे. देशातील अनेक निवृत्त प्रशासकीय अधिकारी, कुलगुरू, शिक्षणतत्ज्ञ, तंत्रज्ञ या प्रकल्पावर काम करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo