पाचवी , आठवी, नववी , अकरावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास न्यायालयाची  परवानगी

कर्नाटक उच्च न्यायालयाने एकल खंडपीठाचा या आधीचा  आदेश रद्द करत  राज्य सरकारला 2023-24 सत्रासाठी इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

पाचवी , आठवी, नववी , अकरावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास न्यायालयाची  परवानगी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता 5 वी, 8 वी, 9 वी आणि 11 वीच्या बोर्ड (Karnatka Board exam) परीक्षा घ्याव्यात की नाही यावरून कर्नाटक राज्यात सुरु असलेला तिढा अखेर सुटला (Exam question solved) असल्याचे चिन्ह आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Courts of Karnataka) एकल खंडपीठाचा या आधीचा आदेश रद्द करत  राज्य सरकारला 2023-24 सत्रासाठी इयत्ता पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती रवी होसमनी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 6 मार्च दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती के. सोमशेखर आणि न्यायमूर्ती के. राजेश राय यांच्या खंडपीठाचा हा निर्णय  दिला आहे.  

न्यायालयाच्या निर्णयामुळे आता सरकारला इयत्ता पाचवी, आठवी आणि नववीच्या रखडलेल्या परीक्षा सुरू करण्याची आणि इयत्ता अकरावीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. विभागीय खंडपीठाने 18 मार्च रोजी राज्य सरकार आणि याचिकाकर्ता-शाळा संघटनांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणावर चर्चा केली आणि शुक्रवारी निकाल दिला.