राज्यपालांनी थेट मोदी सरकारकडे केली शिक्षण मंत्र्यांची तक्रार

राज्यपालांनी अलीकडेच ८ विद्यापीठांसाठी कुलगुरूंची नियुक्ती केली. राज्यपालांच्या या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली आणि हा राज्यशासित विद्यापीठांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

राज्यपालांनी थेट मोदी सरकारकडे केली शिक्षण मंत्र्यांची तक्रार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विद्यापीठांमधील कुलगुरूंच्या (Vice Chancellor) निवडीवरून राज्य सरकार (State Government) आणि राज्यपाल (Governor) यांच्यात खडाजंगी सुरु आहे. सध्या हा वाद विकोपाला पोहोचला असून पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस (CV Ananda Bose) यांनी राज्याचे शिक्षण मंत्री ब्रात्य बसू (Bratya Basu) यांच्या विरोधात गोपनीय पत्र लिहीत केंद्र शासनाकडे तक्रार केली आहे. 

बोस यांनी शनिवारी मध्यरात्री बसू यांच्याविरोधात तक्रारींचे पत्र लिहिले असल्याची माहिती PTI या वृत्त संस्थेने दिली आहे. राज्यपाल बोस यांनी 'दोन गोपनीय सीलबंद पत्रांवर स्वाक्षरी केली आहे, त्यापैकी एक राज्य सचिवालय आणि दुसरे केंद्र सरकारला उद्देशून आहे, अशी माहिती समोर येत आहे. 

NEP 2020 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र काय आहे? हे होतील बदल...

राज्यपालांनी अलीकडेच ८ विद्यापीठांसाठी कुलगुरूंची नियुक्ती केली. राज्यपालांच्या या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली आणि हा राज्यशासित विद्यापीठांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

या संदर्भात शिक्षणमंत्री बसू यांनी नुकतेच राज्यपालांवर राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आणि विद्यापीठांमध्ये 'कठपुतली राजवट' प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.या वादानंतर राज्यपालांनी शिक्षणमंत्र्याविरोधात मध्यरात्री मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिक्षणमंत्र्यांनीही पुन्हा हल्लाबोल करत राज्यपालांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j