नेट परीक्षेच्या तारखा जाहीर; डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा

देशात यावर्षी युजीसी नेट जुन २०२३ ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आली. ही परीक्षा १३ ते १३ जून आणि १९ ते २२ जून दरम्यान परीक्षा झाली.

नेट परीक्षेच्या तारखा जाहीर; डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा
UGC NET 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

देशभरातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदभरतीसाठी आवश्यक पात्रता असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) च्या डिसेंबर महिन्यातील तारखा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (NTA) जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार युजीसी नेट ही परीक्षा दि. ६ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी नोंदणीबाबतची प्रक्रिया नंतर जाहीर केली जाणार असल्याचे एनटीएकडून सांगण्यात आले.

 

देशात यावर्षी युजीसी नेट (UGC NET) जुन २०२३ ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आली. ही परीक्षा १३ ते १३ जून आणि १९ ते २२ जून दरम्यान परीक्षा झाली. त्यानंतर आता एनटीएकडून डिसेंबर महिन्यातील परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याआधी पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकही एनटीएकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील वर्षी ही परीक्षा १० ते २१ जून या दरम्यान होणार आहे.

राज्यभर आंदोलन पेटवणार, तारीख जाहीर! रोहित पवारांकडून सरकारला पुन्हा अल्टिमेटम

 

दरम्यान, 'एनटीए'कडून दरवर्षी काही महिने आधीच प्रमुख परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. या सर्व परीक्षा एनटीएकडून देशभरात घेतल्या जातात. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आयआयटीमध्ये प्रवेशासाठी जेईई परीक्षेला खूप महत्व आहे. या परीक्षा संगणक आधारीत असतात. वेळापत्रकानुसार जेईई परीक्षेचा पहिला टप्पा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी तर दुसरा १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

 

नीट परीक्षा पाच मे रोजी नियोजित आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET UG) दि. १५ ते ३१ मे दरम्यान होईल. तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची (CUET PG) परीक्षा दि. ११ ते २८ मार्च या कालावधी घेण्यात येणार आहे.

 

परीक्षांविषयीची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिध्द केली जाईल. संगणक आधारीत सर्व परीक्षांचे निकाल परीक्षा झाल्यानंतर पुढील तीन आठवड्यांमध्ये जाहीर केले जाणार आहेत. तर नीट परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

 

परीक्षांविषयी अधिक माहितीसाठी - https://nta.ac.in/ 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j