NEP 2020 : शाळांमध्ये कशी करायची अंमलबजावणी? विशेष परिषदेत होणार मंथन

‘लीडर्स लीप समिट २०२३’ ही परिषद येत्या २० जुलै रोजी बाणेर रस्त्यावरील यशदा सभागृहामध्ये होणार आहे.

NEP 2020 : शाळांमध्ये कशी करायची अंमलबजावणी? विशेष परिषदेत होणार मंथन
Leaders Leap Summit 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशातील शिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी सुरू झाली आहे. शालेय स्तरापासून (School Education) उच्च शिक्षणापर्यंत (Higher Education) अनेक क्रांतीकारी बदल करण्याची क्षमता असलेले हे धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत विचारमंथन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था पुणे (Maharashtra Rajya Shikshan Sanstha Pune) आणि अक्षर पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लीडर्स लीप समिट २०२३’ (Leaders Leap Summit 2023) या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लीडर्स लीप समिट २०२३’ ही परिषद येत्या २० जुलै रोजी बाणेर रस्त्यावरील यशदा सभागृहामध्ये होणार आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत परिषदेत एनईपीच्या अनुषंगाने दिवसभर मंथन होणार असून त्यात अनेक मान्यवर सहभागी होत मार्गदर्शन करणार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे हे या परिषदेतील प्रमुख वक्ते आहेत.

धक्कादायक : शिक्षणाधिकाऱ्याची बनावट सही करून शाळेने मिळवली बोर्डाची मान्यता

महाराट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे याही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद आयोजित करण्यात आली आहे. गुरुचरणसिंह संधू यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या १० ते १५ दिवसांत एनईपीवर सर्वांसाठी खुला परिसंवाद भरविला जाणार असल्याचे संधू यांनी सांगितले. दि. २० जुलै रोजी होणारी परिषद निमंत्रितांसाठी असल्याचेही संधू यांनी स्पष्ट केले.

प्रामुख्याने शालेय स्तरावर एनईपीच्या अंमलबजावणीबाबत परिषदेत चर्चा होणार आहे. शालेय स्तर हा शिक्षणाचा पाया असल्याने या स्तरापासूनच अधिक प्रभावीपणे धोरणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शाळा व्यवस्थापनांचीही यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनईपीमध्ये केलेल्या शिफारशींनुसार शाळांमध्ये विविध मुलभूत बाबीची कशाप्रकारे अंमलबजावणी करावी लागेल, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, फायदे अशा विविध मुद्यांवर चर्चा होईल.

11th Admission : तीन फेऱ्यांनंतरही ६० टक्के जागा रिक्त, मुंबई-पुणे आघाडीवर

दरम्यान, परिषदेसाठी नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून आता नोंदणी थांबविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा अशाचप्रकारे परिषदेचे आयोजन करण्याचे विचाराधीन असून यावेळी इतरांनाही संधी देता येईल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी यांनी केले आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD