भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी ; विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in. वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जूनपर्यंत देण्यात आली आहे.     

भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी ; विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेट

 भारतीय सैन्यात नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी मोठी आणि  महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force)  विविध पदांच्या ३०४ जागांसाठी भरती (Recruitment for 304 posts of various posts) प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात (Start the application process) झाली असून इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ indianairforce.nic.in. वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जूनपर्यंत देण्यात आली आहे.     

भारतीय हवाई दलात फ्लाइंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी, ग्राउंड ड्युटी (नाॅन टेक्निकल) यासह विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यासाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी  गणित आणि भौतिकशास्त्र विषयात उमेदवाराला बारावीमध्ये किमान 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. शिवाय पदवीधर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, पदवीच्या अभ्यासात 60 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. बीई आणि बीटेक पास उमेदवारांना देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना पाहावी. 

एएफसीएटी साठी 20 ते 24 वर्षे वयमर्यादा आहे. तर ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) साठी 20 ते 26 च्या दरम्यान वय असणे आवश्यक आहे. AFCAT लेखी परीक्षा 9, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.  लेखी परीक्षा किंवा AFSB चाचणीच्या आधी किंवा नंतर कोणत्याही वेळी पडताळणी करताना, उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाहीत, असे आढळून आल्यास त्यांची उमेदवारी IAF द्वारे रद्द केली जाईल, असे अधिकृत सूचना पत्रात म्हटले आहे.