सीईटी परीक्षांच्या तारखा पुन्हा बदलल्या : MHT CET PCM, LLB अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा होणार ?

महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर कार्यक्रमांच्या परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल (Change in exam dates once again)केला आहे.

सीईटी परीक्षांच्या तारखा पुन्हा बदलल्या : MHT CET PCM, LLB अभ्यासक्रमांच्या परीक्षा केव्हा होणार ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग (Engineering, 5-year LLB, Nursing) आणि इतर कार्यक्रमांच्या परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल (Change in exam dates once again)केला आहे.  आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे रोजी होणार असल्यामुळे त्या दिवशी पीसीएम ग्रुपची कोणतीही परीक्षा होणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे CET सेलने MH CET 2024 च्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची ही दुसरी वेळ आहे. अलीकडेच  विविध अभ्यासक्रमांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.  ज्यामध्ये पीसीबी आणि पीसीएम जे सुरुवातीला 16 ते 30 एप्रिल दरम्यान नियोजित होते ते पुढे ढकलण्यात आले. तथापि, परीक्षा कक्षाने नंतर कळवले की एमएचटी सीईटी परीक्षा 5 मे रोजी घेतली जाणार नाही आणि सुधारित परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

सुधारित वेळापत्रकानुसार, MH 5 वर्षांची LLB CET 17 मे ऐवजी 18 मे रोजी होणार आहे आणि MH नर्सिंग CET परीक्षा जी 18 मे रोजी होणार होती ती आता 24 आणि 25 मे रोजी होणार आहे. तसेच चार वर्षांची  MAH-B.A./B.Sc. B.Ed. परीक्षा 18 मे रोजी होणार आहे. BHMCT CET परीक्षा 22 मे रोजी होणार आहे. तर BCA/BBA/BMS/BBMCET परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान होणार आहे. तर MH-DPN/ PHN CET , MAH-PGP-CET / PGO-CET / M.Sc(A आणि SLP)-CET/M.Sc(P&O)-CET  या परीक्षांच्या सुधारित  तारखानंतर जाहीर केल्या जाणार आहेत.