MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; कोणाला मिळले कोणते पद ?

आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालातून कोणाला कोणते पद मिळणार याची प्रतीक्षा होती. अखेर याबाबतचा निकाल जाहीर झाला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

MPSC Result : राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर; कोणाला मिळले कोणते पद ?
MPSC Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या 'राज्यसेवा परीक्षा २०२१ ' चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता आयोगातर्फे विविध पदांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांकाने यश मिळवलेल्या प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) यांनी  डीवाय एसपी पद प्राप्त केले आहे. (MPSC Result declared) यापूर्वी कोणत्या उमेदवाराला कोणते पद मिळणार हे माहीत नव्हते.आता प्रत्येक उमेदवाराला आपल्याला कोणते पद मिळणार हे समोर आले आहे. 

आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ परीक्षेच्या निकालातून कोणाला कोणते पद मिळणार याची अनेकांना उत्सुकता होती. अखेर याबाबतचा निकाल जाहीर झाला असून आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे. यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी निकालानुसार उमेदवारांना पदे मिळाली आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेची केवळ प्राथमिक यादी प्रसिद्ध झाली असून उत्तीर्ण उमेदवारांना 'ऑप्टिंग आऊट' चा पर्याय दिला जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी केली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2