LLB 5 वर्ष CET ऑनलाईन अर्जास पुन्हा एकदा 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

अर्ज नोंदणीची ही अंतिम मुदत आहे यापुढे कोणतीही मुदतवाढ केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. 

LLB 5 वर्ष CET ऑनलाईन अर्जास पुन्हा एकदा 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (Maharashtra State Common Entrance Test) कक्षाने MAH LLB 5 वर्षांच्या CET साठी नोंदणी करण्यास पुन्हा एकदा ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यास शेवटची अंतिम मुदत दिली आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ (Final extension) दिली  जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सीईटी सेलकडून पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

MAH LLB 5 वर्षे CET 2023 परीक्षा नोंदणीची अंतिम मुदत 18 फेब्रुवारी होती, ती नंतर एक महिन्याने वाढवून 18 मार्चपर्यंत करण्यात आली होती. आता ती पुन्हा एकदा 30 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. मूळ वेळापत्रकानुसार, परीक्षा 3 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, सार्वत्रिक निवडणुकांमुळे परीक्षेची तारीख बदलू शकते. सविस्तर माहितीसाठी cetcell.mahacet.org संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्या. खुल्या प्रवर्गातील, महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील EWS श्रेणीतील उमेदवार, सर्व श्रेणीतील भारतीय उमेदवार आणि जम्मू-काश्मीर स्थलांतरितांसाठी अर्ज शुल्क 1 हजार रुपये आहे.

MAH-LLB 5 वर्षे परीक्षा: अर्ज कसा करावा


सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. होम पेजवर दिलेला MAH LLB 5 वर्षे CET 2023 टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. नवीन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल तर इतरांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.