CSIR SO ASO Result 2024 : पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षेत बसलेले उमेदवार CSIR च्या अधिकृत वेबसाइट www.csir.res.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

CSIR SO ASO Result 2024 : पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) CSIR SO ASO पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार CSIR च्या अधिकृत वेबसाइट www.csir.res.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. CSIR SO ASO निकालासोबतच उमेदवारांची स्कोअरकार्ड आणि श्रेणीनिहाय कटऑफ यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

पहिल्या टप्प्यातील परीक्षेत निवड झालेल्या उमेदवार आता दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. CSIR ने या निवडलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत एकूण ८ हजार ८८० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आहेत .त्यांची नावे गुणवत्ता यादीत देण्यात आली आहेत. 

असा पाहा निकाल

सर्वप्रथम CSIR च्या अधिकृत वेबसाईट www.csir.res.in ला भेट द्या. यानंतर रिक्रूटमेंट आणि रिझल्ट विभागात जा. आता CSIR CASE SO ASO निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या समोर एक PDF फाईल येईल. ज्यामध्ये सर्व उमेदवारांची नावे लिहिली आहेत. याशिवाय, जर तुम्हाला तुमचा स्कोअर तपासायचा असेल तर, नोंदणीकृत ईमेल आयडी, जन्मतारीख आणि कॅप्चा कोडच्या मदतीने लॉग इन करा. तुम्ही लॉग इन करताच तुमच्या स्क्रीनवर स्कोअर कार्ड दिसेल.