JEE Main 2024 परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल 

JEE Main 2024 परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पुन्हा एकदा संयुक्त प्रवेश परीक्षा – मुख्य (JEE Main 2024) सत्र 2 च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता जेईई मुख्य सत्र 4  ते 12 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे. JEE Main 2024 परीक्षा आधी 4  ते 15 एप्रिल दरम्यान होणार होती.

JEE मुख्य परीक्षा सत्र 2  BE, B.Tech परीक्षा 4, 5, 6, 8 आणि 9 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते 6 या दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील. तर पेपर 2- बी.आर्क आणि बी.प्लॅनिंग परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील.

NTA  कडून  JEE मुख्य सत्र 2 परीक्षा  भारताबाहेरील 22 शहरांसह देशभरातील अंदाजे 319 शहरांमध्ये असलेल्या विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन्स एप्रिल सत्रात बसण्यासाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट, jeemain.nta.ac.in किंवा jeemainsession2.ntaonline.in वरून JEE परीक्षेची सिटी स्लिप डाउनलोड करू शकतील. जेईई मुख्य प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या तीन दिवस आधी जारी केले जाईल, अशी सूचना NTA कडून देण्यात आली आहे.