कोटा कोचिंग सिस्टीममध्ये मोठे बदल ; कोचिंग अर्ध्यातून सोडण्याचा पर्याय 

राजस्थान सरकारने कोचिंग संस्थांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुल्क परताव्यासह कोचिंग अर्ध्यातून सोडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोटा कोचिंग सिस्टीममध्ये मोठे बदल ; कोचिंग अर्ध्यातून सोडण्याचा पर्याय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राजस्थान मधील कोटा शहरात (city of Kota in Rajasthan) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या (student suicides ) हा सध्या गंभीर विषय बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व स्थरातून प्रयत्न होत असताना आता राजस्थान सरकारने कोचिंग संस्थांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी (Government of Rajasthan issued necessary guidelines for coaching institutes) केली आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना शुल्क परताव्यासह कोचिंग अर्ध्यातून सोडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हेही वाचा : शिक्षण संयुक्त पेपर १ : परीक्षा केंद्रावर हुज्जत घालणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीकडून कारवाई

विद्यार्थ्यांना नाववीच्या आधी प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करू नका, जर कोणत्याही विद्यार्थ्याला  नाववीच्या आधी कोचिंग सोडायचे असेल तर त्याला थांबवू नका आणि उर्वरित फी परत करा. स्क्रिनिंग टेस्ट आणि समुपदेशनाद्वारे मूल्यांकन केल्यानंतरच प्रवेश द्या.पालकांचेही समुपदेशन केले पाहिजे.प्रवेश घेतल्यानंतर पालकांना वेळोवेळी मुलाच्या प्रगतीची माहिती द्या.

कोचिंग संस्थांनी परीक्षेचे निकाल सार्वजनिक करू नयेत, निकाल गोपनीय ठेवताना त्यांच्या स्तरावर नियमित विश्लेषण करावे,कमी गुण मिळवणाऱ्या किंवा त्याची शैक्षणिक कामगिरी कमी होत असलेल्या मुलाचे समुपदेशन करावे. मूल्यांकन चाचणीच्या आधारे बॅचेस वेगळे करू नका. कोचिंग क्लासने इझी-एक्झिट ऑप्शन आणि फी रिफंड पॉलिसीचा अवलंब करावा,  टेली-मानस टोल फ्री हेल्पलाइन नंबर 1800894416, 14416 प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये जाहीर करणे आवश्यक आहे, असे आदेश कोचिंग क्लास चालकांना देण्यात आले आहेत.

कोटामधून सातत्याने विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या बातम्या समोर आल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमधील वाढता ताण, मानसिक दडपण आणि आत्महत्यांमागील कारणांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याशिवाय, कोचिंग संस्था, पीजी/हॉटेल्स आणि प्रशासनासाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थान सरकारने कोचिंग संस्थांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच या समस्येचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने कोचिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांमधील वाढता ताण, मानसिक दबाव आणि आत्महत्यांमागील कारणांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.