NEET MDS 2024 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

इंटर्नशिपची कटऑफ तारीख वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

NEET MDS 2024 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET PG 2024 च्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.  NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST- मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (NEET MDS 2024) परीक्षा आणि इंटर्नशिपची कटऑफ तारीख (Cutoff Date of Exam and Internship)वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता NEET 2024 ची परीक्षा नियोजित तारखेला होणार आहे.

 NEET MDS परीक्षा आता नियोजित तारखेला म्हणजे  18 मार्च 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. या परीक्षेच्या अर्जाची प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण झाली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनला (NMC) ही परीक्षा जुलै 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचे आणि इंटर्नशिप कटऑफची तारीख वाढवण्याचे आदेश द्यावेत, अशी याचिका NEET परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात NEET MDS 2024 पुढे ढकलण्यासंबंधीची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी करताना खंडपीठाने राष्ट्रीय दंत आयोगाने केलेल्या विनंतीवर आपल्या निर्णयात म्हटले आहे की, " आम्ही या प्रकरणाच्या तारखेपासून शक्य तितक्या लवकर आणि शक्यतो एक आठवड्याच्या कालावधीत प्रतिनिधित्व निकाली काढण्याचे निर्देश देतो. आम्ही स्पष्ट करतो की आम्ही कोणतेही मत व्यक्त केलेले नाही आणि यावर निर्णय घेणे बाकी आहे. या प्रकरणी  निर्णय घेण्यास केंद्र सरकार स्वतंत्र आहे.