CSIR UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 

डिसेंबर महिन्यात  २६ ते २८  या कालावधीत CSIR UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे.

CSIR UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेतल्या जाणाऱ्या CSIR NET परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे .डिसेंबर महिन्यात  २६ ते २८  या कालावधीत CSIR UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. CSIR NET- २०२३ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना csirnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करून घेता येतील. 

हेही वाचा : Breaking News : विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने प्रसिध्द केलेल्या हॉल तिकीटाबाबत उमेदवारांना काही समस्या असल्यास NTA च्या हेल्पडेक्सशी संपर्क साधावा. उमेदवारांनी पात्रतेची पूर्तता केल्याचे गृहीत धरून त्यांना तात्पूर्ते हॉल तिकीट दिले आहे. उमेदवारांना हॉल तिकीट पोस्टाने पाठवले जाणार नाही. तसेच हॉल तिकीटामध्ये फेरफार करू नये किंवा त्यामध्ये केलेली कोणतीही नोंद बदलू नये,अशा सूचना NTA ने दिल्या आहेत. 

हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
* csirnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* “Joint CSIR UGC NET हॉल तिकीट ” या लिंकवर क्लिक करा.
* सुरक्षा पिनसह तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका 
* सबमिट करा आणि प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
* हॉल तिकीट डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.