विद्यापीठ,प्राध्यापकांचे काम वाढले; एनईपी अंमलबजावणीची घडी विस्कटली, विषय रचना पुन्हा बदलावी लागणार  

विद्यापीठांना पुन्हा नव्याने प्रथम वर्षांच्या विषयाच्या अभ्यासक्रमाची रचना बदलावी लागणार आहे.

विद्यापीठ,प्राध्यापकांचे काम वाढले; एनईपी अंमलबजावणीची घडी विस्कटली, विषय रचना पुन्हा बदलावी लागणार  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्वायत्त महाविद्यालयांच्या फिडबॅकनुसार सुकाणू समितीने (sukanu Samiti) एनईपी अंमलबजावणीच्या (NEP implementation)नियमांमध्ये ऐनवेळी बदल केला.त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांचे नियोजन काहीसे कोलमडणार (The planning of all universities will collapse)आहे.विद्यापीठांना पुन्हा नव्याने प्रथम वर्षांच्या विषयाच्या अभ्यासक्रमाची रचना (Curriculum structure of first years subject) बदलावी लागणार आहे.त्यास फार कालावधी लागणार नाही,असे विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांकडून सांगितले जात असले तरी विद्यापीठ व प्राध्यापकांचे काम वाढले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना मेजर विषय घ्यावा लागणार आहे.हा नियम गृहीत धरून अभ्यासक्रम तयार केला. त्यास मान्यता घेऊन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपलोड केला.मात्र,या नियमावलीत नुकताच बदल झाला आहे.विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाऐवजी आता द्वितीय वर्षापासून मेजर विषय निवडावे लागणार आहेत.त्यामुळे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांना व विद्या परिषदेला त्यादृष्टीने रचना बदलून पुन्हा नव्याने विषयांची माहिती विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी लगाणार आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : NEP नियमावलीत बदल; विद्यार्थ्यांना दिलासा, प्राध्यापकांची नोकरी वाचली,मेजर विषय दुसऱ्या वर्षांपासून
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लवकरच त्या- त्या विषयाच्या अभ्यास मंडळांची बैठक बोलावून झालेल्या बादलानुसार विषयांची रचना केली जाणार आहे.त्यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक विद्यापीठातर्फे दोन दिवसात प्रसिध्द करण्यात येणार आहे.तसेच केवळ अभ्यासक्रम तयार करून चालणार नाही तर एकूण एनईपीमुळे झालेल्या बदलांबाबत सर्व प्राध्यापकांना कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करावे लागणार आहे.तसेच विद्यार्थी व पालकांच्या विविध प्रश्नांचे समाधान करावे लागणार आहे.त्याबाबतही विद्यापीठाकडून सकारात्मक हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एनईपीच्या नियमावलीत बदल केल्यामुळे प्राध्यापक व विद्यापीठाच्या अधिकारी वर्गात काहीशी नाराजी आहे.मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करून  सुकाणू समितीने हा बदल केला असल्याचे बोलले जात आहे. 
---------------------------------