UPSC असिस्टंट कमांडंट भरती परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध ; 10 मार्च होणार परीक्षा

सीआयएसएफ असिस्टंट कमांडंट पदाच्या भरती प्रक्रियेतील प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत.

UPSC असिस्टंट कमांडंट भरती परीक्षेसाठी हॉल तिकीट  प्रसिद्ध ; 10 मार्च होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सीआयएसएफ असिस्टंट कमांडंट (executive) पदाच्या भरतीसाठी (LDCE) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) या भरतीसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहेत. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध आहेत. अर्जदार वेबसाइटला भेट देऊन किंवा या पेजवर दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

CISF AC परीक्षा 10 मार्च 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांनी हॉल तिकीट प्रत आणि एक वैध ओळखपत्र परीक्षा केंद्रात सोबत ठेवावे, हॉल तिकीट आणि ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

असे डाउनलोड करा प्रवेशपत्र

UPSC AC LDCEहॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. वेबसाईटच्या होम पेजवर नवीन What's Section मध्ये e - Admit Card: CISF AC(EXE) LDCE-2024 च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर, संबंधित लिंकवर क्लिक करून पुढे जा.  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी CISF नंबर किंवा रोल नंबरवर क्लिक करा. रोल नंबर, जन्मतारीख आणि दिलेला कोड भरा आणि सबमिट करा. माहिती सबमिट करताच, तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर उघडेल जिथून  त्याची प्रिंटआउट घेता येऊ शकते.