कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिध्द 

कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या 2 ते 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते 12.15 या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिध्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरी(Company Secretary)परीक्षेसाठी जून 2024 चे हॉल तिकीट प्रसिध्द केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट  www.icsi.edu ला भेट देऊन हॉल तिकीट (Hall ticket)डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांनी  हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावर दिलेले त्यांचे वैयक्तिक तपशील (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इ.) तपासावेत. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास सुधारण्यासाठी ताबडतोब ICSI हेल्पलाइनशी enroll@icsi.edu.या मेल आयडी वरून संपर्क साधावा, अशी सूचना ICSI कडून देण्यात आली आहे. 

कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या 2 ते 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते 12.15 या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सकाळी 9 ते 9.15 पर्यंत 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल.


असे करा हॉल तिकीट डाउनलोड   
* सर्व उमेदवारांनी प्रथम icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
* मुख्यपृष्ठावरील ICSI CS जून 2024 प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
* आता आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा. 
* हॉल तिकीट तपासा आणि डाउनलोड करा. 
* पुढील आवश्यकतेसाठी प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या.