ITI Admission : ‘आयटीआय’ प्रवेशाची प्रतिक्षा संपली! सोमवारपासून भरा अर्ज

येत्या शैक्षणिक वर्षासाठी आयटीआयच्या १ लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शासकीय संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि खासगी संस्थांमध्ये ५९ हजार १२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

ITI Admission : ‘आयटीआय’ प्रवेशाची प्रतिक्षा संपली! सोमवारपासून भरा अर्ज
ITI Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI Admission) प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (दि. १२ जून) सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे (DVET) संचालक दि. अं. दळवी यांनी केले आहे. यावर्षी आयटीआयसाठी दीड लाखांहून अधिक जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Maharashtra ITI Admission Process)

आयटीआय प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून

दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षासाठी आयटीआयच्या १ लाख ५४ हजार ३९२ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शासकीय संस्थांमध्ये (Government ITI) ९५ हजार ३८० आणि खासगी संस्थांमध्ये (Private ITI) ५९ हजार १२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यात येणार आहेत. यावर्षी एकूण ४१८ शासकीय आणि ५७४ अशासकीय संस्थांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.

होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...

यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८३ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo