बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ जूनपासून ऑनलाईन नोंदणी तसेच कागदपत्रांची छाननी करता येईल.

बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून
Post HSC Diploma Admission process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी पदविका (Engineering Diploma) अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया (Centralised Admission Process) सोमवारपासून (दि. १२ जून) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय या प्रक्रिये सहभागी होता येणार नाही. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ११ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिध्द केली जाईल. त्यानुसार पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांमधील प्रवेश निश्चित होईल. (Post HSC Engineering Diploma admission process)

इयत्ता बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, जैवतंत्रज्ञान, कृषी, तंत्र व्यावसायिक विषय़, कृषी, इंजिनिअरींग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आदी विषयांतील किमान तीन विषय असलेल्या विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदविकेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो.

राज्यांतील सर्व बोर्ड 'परख' एकाच व्यासपीठावर ; दहावी-बारावीच्या परीक्षेत होणार बदल

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ जूनपासून ऑनलाईन नोंदणी तसेच कागदपत्रांची छाननी करता येईल. त्यासाठी यावर्षी दोन पर्याय देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या किंवा सुविधा केंद्रावर जाऊन छाननीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आह.

कागदपत्रांच्या छाननीसाठी दोन पर्याय

पर्याय १ :- उमेदवार ऑनलाईन नोंदणी करून "ई-स्क्रूटनी" पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. या पद्धतीमध्ये उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून इंटरनेटशी जोडलेल्या संगणक/ स्मार्टफोन द्वारे ऑनलाईन अर्ज भरतील आणि सबमिट करतील व आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील तसेच उमेदवाराला अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. उमेदवाराचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे (एफसी द्वारे) पडताळले जातील व निश्चित केले जातील.

होय, आम्ही MPSC कर! सुशील काटकरांचा वडापावची गाडी ते हॉटेलपर्यंतचा प्रवास व्हाया MPSC...

पर्याय २ : - उमेदवार मोबाईलवरून (स्मार्टफोन) अथवा संगणकावरून ऑनलाईन नोंदणी करून "प्रत्यक्ष स्क्रूटनी" पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. ज्या उमेदवारांकडे संगणक अथवा मोबाईल (स्मार्टफोन) इत्यादी सुविधा नाहीत असे उमेदवार त्यांच्या सर्वात जवळील सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी व सोयीस्कर वेळ ठरवण्यासाठी जाऊ शकतील. अश्याप्रकारे ऑनलाईन नोंदणी झालेले उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी सुविधा केंद्राची तारीख व वेळ ठरवून घेतील. उमेदवार ऑनलाईन अर्ज भरणे, स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया सुविधा केंद्रावर स्वतः निशुल्कपणे करू शकतील. उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेत सुविधा केंद्रावर उपस्थित राहून व सामाजिक अंतर नियमांचे पालन करून अर्ज पडताळणी व त्याची निश्चित करणे अशा प्रक्रिया निशुल्क पार पडतील.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे – १२ जून ते ३ जुलै

कागदपत्रांची छाननी व अर्ज निश्चिती – १२ जून ते ३ जूलै

तात्पुरती गुणवत्ता यादी – ५ जुलै

गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे – ६ ते ९ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी – ११ जुलै

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo