आयुष करणार कोट्यातील प्रवेशासाठी समुपदेशन; वेळापत्रकाची प्रतिक्षा

NEET UG समुपदेशन २०२३ चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

आयुष करणार कोट्यातील प्रवेशासाठी समुपदेशन; वेळापत्रकाची प्रतिक्षा
Ayush admission Counseling 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NEET UG २०२३ समुपदेशन : आयुष मंत्रालयाच्या आयुष प्रवेश केंद्रीय समुपदेशन समिती (AACCC) द्वारे देशभरातील आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी आयुर्वेद संस्थांमधील वैद्यकीय महाविद्यालये यांच्या १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांवर प्रवेशासाठी समुपदेशन (Councelling) केले जाईल. यामध्ये पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजचाही (B J Medical College) समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) ने ही माहिती दिली आहे. याशिवाय अनुदानित आयुर्वेद/सिद्ध/युनानी/होमिओपॅथी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांच्या १०० टक्के जागा, केंद्रीय विद्यापीठे/राष्ट्रीय संस्था तसेच दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या अंतर्गत ५० टक्के जागांसाठी ऑनलाईन समुपदेशन घेण्यात येणार आहे.

अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

NEET UG समुपदेशन २०२३ चे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA ) ने  या वर्षी देशभरातील वैद्यकीय, डेटा, आयुष आणि नर्सिंग शिक्षण संस्थांमधील पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२३ परीक्षा घेतली होती. १३ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD