NCERT विरोधात शिक्षणतज्ज्ञांचे बंड; पाठ्यपुस्तकातून नावे वगळण्याची ३३ जणांची मागणी

काही दिवसांपूर्वीच योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातुन आपली नावे वगळण्याची मागणी  केली होती.

NCERT विरोधात शिक्षणतज्ज्ञांचे बंड; पाठ्यपुस्तकातून नावे वगळण्याची ३३ जणांची मागणी
NCERT Textbooks issue

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NCERT Textbooks : पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलांमुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता एनसीईआरटी समोर अडचण निर्माण झाली आहे. राज्यशास्त्र (Political Science) विषयाच्या पाठ्यपुस्तक विकास समितीचे सदस्य असलेल्या ३३ शिक्षणतज्ज्ञांनी (Educationist) पुस्तकातून आपली नावे वगळण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच योगेंद्र यादव (Yogendra Yadav) आणि सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातुन आपली नावे वगळण्याची मागणी  केली होती. यादव आणि पळशीकर यांच्या पाठोपाठ आता २००६-२००७ मध्ये राज्यशास्त्र विषयातील पाठ्यपुस्तक विकास समितीचे सदस्य असलेल्या ३३ शिक्षण तज्ज्ञांनीही हे पाऊल उचलले असल्याने एनसीईआरटी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात १५० नवीन महाविद्यालये सुरू होणार; महिलांसाठी सर्वाधिक ३४... पुणे-मुंबई आघाडीवर

‘एनसीईआरटी’चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे. "आम्ही तयार केलेल्या मूळ अभ्यासक्रमात आता बरेच बदल करून ते विविध पाठयपुस्तकांमध्ये वापरण्यात येत आहेत. हा बदलेला अभ्यासक्रम आम्ही तयार केला आहे, असे म्हणणे तर्कशुद्ध ठरणार नाही, त्यामुळे या पाठ्यपुस्तकातून आमची नावे वगळावीत," अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.  

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू कांती प्रसाद बाजपेयी, अशोका विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रताप भानू मेहता,  CSDS चे माजी संचालक राजीव भार्गव,   जेएनयूच्या माजी प्राध्यापिका नीरजा गोपाल जयल,   जेएनयूमधील प्राध्यापक निवेदिता मेनन,  कॉमन कॉजचे प्रमुख विपुल मुद्गल, हैदराबाद विद्यापीठातील माजी प्राध्यापक  केसी सुरी,  आणि  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे माजी संचालक पीटर रोनाल्ड डिसूझा आदींनी हे पत्र लिहिले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo